Faisal Khan: 'मावशीसोबत लग्न करण्याचा दबाव..' आमिर खानच्या भावाचे कुटंबावर गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाला?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Faisal Khan Allegations :बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा भाऊ फैसल खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने कुटुंबावर आणि आमिरवर धक्कादायक आरोप केले आहेत.
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा भाऊ फैसल खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने कुटुंबावर आणि आमिरवर धक्कादायक आरोप केले आहेत. फैसलने केवळ आपले कुटुंबाशी संबंध तोडले नसून, त्यांच्याकडून त्याच्यावर मानसिक छळ आणि जबरदस्ती झाल्याचा दावा केला आहे.
फैसलच्या मते, त्याच्या आईसह कुटुंबातील काही सदस्य त्याच्यावर मावशीशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते. ही मावशी म्हणजे त्याच्या आईची चुलत बहीण. मात्र फैसलला हे लग्न मान्य नव्हते. त्याने अनेकदा नकार दिला, पण कुटुंब सतत आग्रह करत राहिले. यामुळे घरात वारंवार भांडणं व्हायची आणि शेवटी त्याने कुटुंबापासून दूर राहणं पसंत केलं.
advertisement
आमिरवर धमकावल्याचा आरोप
फैसलने पत्रकार परिषदेत सांगितले की, एकदा आमिर खान पोलिसांसह आणि डॉक्टरांसह घरी आला होता. त्यावेळी त्याला मानसिक उपचारांसाठी जबरदस्ती नर्सिंग होममध्ये नेण्यात आले. फैसल म्हणाला, “आमिरने मला चुकीच्या पद्धतीने पकडले. त्याने सांगितले की मानसोपचारतज्ज्ञाकडे नाही गेलास तर तुला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून नेऊ. मला धक्का बसला, पण शेवटी मी त्यांच्यासोबत गेलो.”
advertisement
त्याने पुढे सांगितले की, नर्सिंग होममध्ये नेल्यावर त्याचा फोन काढून घेतला गेला आणि त्याला पूर्णपणे असहाय्य वाटत होते. “मी त्यांच्या दयेवर होतो. मला वाटत होते की आता काहीतरी वाईट होणार. पण मी ते सहन केले. तेव्हाच मी स्वतःला म्हटले की एक दिवस मुंगीही हत्तीला हरवते,”
फैसल खानने 2000 साली आमिरसोबत ‘मेला’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर मात्र तो चित्रपटसृष्टीत सक्रिय राहिला नाही. मानसिक आरोग्य आणि कौटुंबिक वादांमुळे तो वारंवार चर्चेत येत असतो. आता पुन्हा त्याच्या विधानांमुळे आमिर खान आणि त्याच्या कुटुंब चर्चेत आलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 19, 2025 1:12 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Faisal Khan: 'मावशीसोबत लग्न करण्याचा दबाव..' आमिर खानच्या भावाचे कुटंबावर गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाला?