'रेगे'ची स्टोरी खरी का खोटी? आरोह वेलणकरची पोलखोल, पानसेंनी सत्य सांगितलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Abhijit Panse - Aaroh Velankar : 'रेगे' सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी आरोह वेलणकरची पोलखोल केली. रेगे सिनेमाची स्टोरी खरी की खोटी यामागचं सत्य अखेर अभिजीत पानसे यांनी सांगितलं आहे.
मुंबई : 2014 साली आलेल्या 'रेगे' या मराठी सिनेमाची खूप चर्चा झाली होती. अभिजीत पानसे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. 'रेगे'च्या निमित्तानं मराठीत एक वेगळा प्रयोग करण्यात आला होता. आरोह वेलणकर, महेश मांजरेकर, पुष्कर श्रोत्री, संतोष जुवेकर, विजू माने, प्रवीण तरडे, उदय सबनीस, अनंत जोग असे अनेक कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भुमिकेत होते. 'तुमच्या मुलांकडे तुमचं नीट लक्ष आहे का?' अशी टॅगलाइन घेऊन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दरम्यान सिनेमात अनिरुद्ध रेगेची प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता अरोह वेलणकरने एका मुलाखतीत 'रेगे' सिनेमा हा 'सत्यकथा' असल्याचं सांगितलं होतं. त्याने मुलाखतीत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं. दरम्यान रेगेचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी आरोह वेलणकरची पोलखोल केली आहे.
आरोह वेलणकर 'रेगे'बद्दल काय म्हणाला?
आरोह वेलणकर मुक्कामपोस्ट मनोरंजनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, "ती खरी स्टोरी आहे. त्यातील सगळी नावं खरी आहेत. सचिन वाझे नाव खरं आहे. प्रदिप शर्मा नाव खरं आहे. सगळ्या डॉनची नावं खरी आहेत. मी जो रोल प्ले केला आहे त्या मुलाचं नाव खरं नाहीये, पण तो मुलगा खरा आहे अस्तित्वात. खऱ्या स्टोरीमध्ये त्याला मारलं नव्हतं एवढाच फरक. त्याच्याबरोबरचे सगळे एन्काऊंटरमध्ये मारले गेले पण तो सुटला."
advertisement
advertisement
आरोह पुढे म्हणाला, "तो खरचं एका डॉक्टरचा मुलगा होता. तो खरंच MBBS ला होता. तो खरंच याच्यात अडकला. फिल्ममध्ये त्याला फॉर ड्रामाटाएझेशनमध्ये त्याला उडवला, पण खऱ्या आयुष्यात त्या मुलाला सोडून दिलं होतं. हे लोकांना माहिती नाहीये."
अभिजीत पानसेंनी 'रेगे'बद्दल खरं काय ते सांगितलं!
मनसे नेते, अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम करणारे अभिजीत पानसे यांनी अमोल परचुरे यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आरोह वेलणकरने एका मुलाखतीत रेगे सिनेमाविषयी जे बोलला त्यावर भाष्य केलं.
advertisement
advertisement
रेगेमधील आरोह वेलणकर म्हणजे अभिजीत पानसे, असं आहे का? असा प्रश्न त्यांना मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत अभिजीत पानसे म्हणाले, "नाही. रेगे ही फिक्शनल स्टोरी आहे. मधे कुठेतरी आरोहने एकदा मुलाखतीत बोलताना म्हटलं की, ती स्टोरी एका इन्सिडन्टमधून घेतली." अभिजीत पानसे यांनी पुढे मिश्किल हसत म्हटलं, "आरोह नाही रे, कोणी सांगितलं तुला, असं नाहीये."
advertisement
रेगे हा फिक्शनल सिनेमा - पानसे
अभिजीत पानसे पुढे म्हणाले, "त्यावेळचे इन्काऊंटर स्पेशलिस्ट, त्यावेळचे गुंड, त्यावेळची जी मोडस ओपरेन्डी होती ती इतकी रिअलिस्टिक दाखवली की ते तसं वाटतं. अशा घटना घडल्याही असू शकतील. पण रेगे हा फिक्शनल सिनेमा आहे."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2025 6:02 PM IST