Success Story : पगारदार नोकरापेक्षा पवनचं नाश्ता सेंटर भारी, दिवसाचा गल्ला फक्त 9 हजार रुपये, मेहनतही तशीच!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
पवन बोर्डे हे पाच वर्षांपासून भजी-पावसह विविध खाद्यपदार्थांचे नाश्ता सेंटर चालवतात. त्यांच्या नाश्त्याच्या चवीमुळे खवय्ये दुरून त्यांच्याकडे येतात.
advertisement
advertisement
वाळूज येथील एमआयडीसी परिसरातील प्रताप चौकात लोडिंग ऑटो-रिक्षामध्ये किचन बनवून आणि नाश्ता सेंटरसाठी लागणारे सर्व साहित्य या ठिकाणी पाहायला मिळते. या नाश्ता सेंटरमध्ये खिचडी, पोहे, भजी-पाव, समोसे, ब्रेडवडा यासह विविध खाद्यपदार्थ त्यांच्याकडे मिळतात. एमआयडीसी परिसर असल्यामुळे या ठिकाणी नेहमी कामगारांची तसेच रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची नाश्ता करण्यासाठी वर्दळ असते.
advertisement
advertisement