Mumbai Mumba Devi : 'आग्री-कोळ्यांच्या मुंबादेवी मंदिरात यूपी-बिहारचा फिल', मराठी अभिनेत्याचा Video व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Yashodhan Gadkari Video on Mumba devi Temple : मुंबई या शहराचं नाव ज्या मुंबादेवीच्या नावाने पडलं. त्या मुंबादेवी मंदिरातील मराठीपण हरवत चाललं आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत तिथली सद्यस्थिती दाखवली आहे.
मुंबईत मराठी माणूस कुठेतरी हरवत चालला आहे, अशी भावना अनेकांच्या मनात घर करून बसली आहे. मुंबादेवीच्या नावावरून या शहराला मुंबई असं नाव पडलं. मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे. पण आज याच मुंबादेवीच्याही मंदिरात मराठीपण कमी होत चालल्याचं चित्र दिसतंय. 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत समरच्या मित्राची भूमिका साकारणारे अभिनेते यशोधन गडकरी यांनी व्हिडीओ शेअर करत मुंबादेवी मंदिरातील सध्याची स्थिती दाखवली.
यशोधन गडकरी यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये म्हटलंय, "मुंबादेवी ही मुळची मराठी, आग्री आणि कोळी लोकांची देवी. इथे आल्यावर एक गोष्ट मला जाणवली, मुंबई सर्वांना सामावून घेते असं म्हणतात आणि मुंबादेवीच्या नावावरूनच मुंबई असं नाव पडलं."
advertisement
"गोष्ट काय जाणवली मला इथे, आपण बघा कर्नाटकातील मंदिरांमध्ये गेल्यानंतर आपल्याला कर्नाटकात आल्याचा फिल येतो, गुजरातमधल्या मंदिरात गेल्यानंतर गुजरातमध्ये गेल्याचा फिल येतो. तसंच युपी, बिहार इथल्या मंदिरांमध्ये गेलो की तिथे गेल्याचा फिल येतो, वैष्णव देवीला गेलो की वैष्णवदेवीचा फिल येतो. मात्र मुंबईतल्या मुंबादेवी मंदिरात गेल्यामध्ये देखील तुम्ही युपी बिहार किंवा वैष्णव देवीच्या मंदिरात आल्याचाच फिल येतो."
advertisement
यशोधन यांनी पुढे म्हटलं, "इथे बाहेर मंदिर परिसरात मराठीपण राहिलंय असं मला बिलकुलच वाटत नाहीये. कारण पूजा साहित्य विकणारी सगळे विक्रेते बऱ्यापैकी अमराठी दिसतायत. मराठी हाताच्या बोटावर मोजणारे असतील. पूजेच्या साहित्याचा जो प्रकार आहे तो सगळा वैष्णव देवी आणि युपी, बिहार वरच्या बाजूला असतो तसा आहे."
advertisement
"आता आपण महाराष्ट्रात, मुंबईत आलो आहोत तर आपल्या पद्धतीच्या ओट्या आणि पूजा साहित्य दिसायला हवं असं माझं व्यक्तिगत मत आहे. असो शेवटी समरसता आहे ही येऊ घातलेली. मुंबई सर्वांना सामावून घेतेय पण हे सामावून घेत असताना मराठी माणूस कुठे आहे याचा प्रत्येकाने विचार करायचा. वाद घालण्यापेक्षा विचार केलेला जास्त बरा", असंही त्यांनी व्हिडीओच्या शेवटी म्हटलंय.
advertisement
अभिनेते यशोधन गडकरी हे अभिनेत्याबरोबच दिग्दर्शक आणि लेखकही आहेत. गेली अनेक वर्षांपासून ते त्यांचं युट्यूब चॅनेलही चालवत आहेत. त्यांच्या युट्यूबर ट्रॅव्हल व्हिडीओ करतात. कामाच्या निमित्तानं प्रवास करताना त्यांना दिसणाऱ्या सुंदर वास्तू, मंदिरे, प्रेक्षणीय स्थळांची माहिती ते त्यांच्या व्हिडीओतून देत असतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 11:09 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mumbai Mumba Devi : 'आग्री-कोळ्यांच्या मुंबादेवी मंदिरात यूपी-बिहारचा फिल', मराठी अभिनेत्याचा Video व्हायरल


