Madhurani Gokhale: 'आई कुठे काय करते' संपताच मधुराणी गोखलेने दिली गुडन्यूज, इंस्टा LIVE मध्ये केला खुलासा

Last Updated:

Madhurani Gokhale: ‘आई कुठे काय करते’ मालिका संपताच अभिनेत्री मधुराणी गोखले भावूक झाली. तिने इंस्टा लाइव्ह येत चाहत्यांनी दिलेल्या प्रेमासाठी आभार मानले.

 'आई कुठे काय करते' संपताच मधुराणी गोखलेने दिली गुडन्यूज
'आई कुठे काय करते' संपताच मधुराणी गोखलेने दिली गुडन्यूज
मुंबई : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सतत चर्चेत असणाऱ्या मालिकांपैकी ही एक मालिका. एका आईच्या आयुष्यावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. या मालिकेचा मोठा चाहतावर्गही बनला. आता अखेर या मालिकेची सांगता झाली आहे. मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपल्यामुळे कलाकार खूप भावूक आहेत. अशातच मालिकेची मेन अभिनेत्री मधुराणी गोखलेनं इंस्टा लाइव्ह येत चाहत्यांचे आभार मानले आणि एक गुडन्यूजही दिली.
‘आई कुठे काय करते’ मालिका संपताच अभिनेत्री मधुराणी गोखले भावूक झाली. तिने इंस्टा लाइव्ह येत चाहत्यांनी दिलेल्या प्रेमासाठी आभार मानले. यावेळी लाइव्हमध्ये मधुराणी इमोशनल झालेली पहायला मिळाली. पाच वर्ष सुरू असलेली मालिका संपल्यामुळे मधुराणीने लाइव्हमधून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी चाहते ‘मिस यू’ मेसेजचा भडिमार करताना दिसले.
advertisement
लाइव्हच्या शेवटी मधुराणीने तिच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज दिली. अभिनेत्री म्हणाली, “अरुंधतीचा प्रवास थांबला असला तरी आम्ही नव्या भूमिकेतून भेट होतच राहिल. अरुंधतीला तुम्ही आणि मी पण मिस करेन. पण मधुराणी तुम्हाला मिस होऊ देणार नाही. अभिनय माझी आवड असल्यामुळे ती मी कधी सोडणार नाही. त्यामुळे आपण पुन्हा नव्या प्रोजेक्टमधून भेटत राहूच. मी नव्या प्रोजेक्टची लवकरच घोषणा करेल.” असंही मधुराणी म्हणाली. “माझ्या नव्या प्रोजेक्टलाही असंच भरभरून प्रेम द्या,” अशीही विनंती यावेळी मधुराणीने केली. मधुराणीने तिच्या नव्या प्रोजेक्टची हिंट देताच तिचे चाहते आनंदी झाले आहेत. तिला पुन्हा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
advertisement
advertisement
दरम्यान, 2019 मध्ये ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तब्बल 5 वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अखेर आता ही लोकप्रिय मालिका संपली असून मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Madhurani Gokhale: 'आई कुठे काय करते' संपताच मधुराणी गोखलेने दिली गुडन्यूज, इंस्टा LIVE मध्ये केला खुलासा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement