'आई कुठे काय करते' पार्ट 2 येणार? मधुराणी प्रभुलकर स्पष्टच म्हणाली, VIDEO मुळे चर्चेला उधाण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
मालिकेतील प्रमुख नायिका मधुराणी प्रभुलकरने इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने या मालिकेच्या दुसऱ्या भागाविषयी सांगितलं आहे.
३० नोव्हेंबरला लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ चा शेवटचा भाग प्रसारित झाला. गेल्या पाच वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.
अखेर पाच वर्षांनी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. प्रेक्षकांप्रमाणेच ही मालिका कलाकारांच्याही मनाच्या जवळची होती. म्हणूनच मालिकेचा शेवटचा भाग शूट झाल्यानंतर मालिकेतील प्रत्येक कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाल्यानंतर या मालिकेतील प्रमुख नायिका मधुराणी प्रभुलकरने इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने या मालिकेच्या दुसऱ्या भागाविषयी सांगितलं आहे.
advertisement
या लाईव्ह व्हिडिओ चॅटमध्ये मधुराणीने प्रेक्षकांचे आभार मानले. यावेळी तिने अरुंधती ही भूमिका तिच्या वाट्याला कशी आली? याविषयी सांगितलं. तसंच ती लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचा खुलासाही केला. दरम्यान तिने ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वाविषयी भाष्य केलं आहे.
advertisement
advertisement
लाईव्ह सेशनमध्ये एका फॅनने मधुराणीला ‘आई कुठे काय करते’च्या दुसऱ्या पर्वाचा प्लॅन करा, असं सांगितलं. यावर मधुराणी म्हणाली, “‘स्टार प्रवाह’चं अकाउंट आहे. त्यांना हे नक्की पाठवा. त्यांनी जर ठरवलं तर आम्हा सगळ्यांना पुन्हा दुसरं पर्व करायला आवडेल.”
‘आई कुठे काय करते’ या मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका घेणार आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता ही नवी मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2024 3:08 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'आई कुठे काय करते' पार्ट 2 येणार? मधुराणी प्रभुलकर स्पष्टच म्हणाली, VIDEO मुळे चर्चेला उधाण