advertisement

वडिलांनंतर 19 वर्षांनी काकांचंही निधन; रवींद्र बेर्डेंच्या आठवणीत भावुक झाली लक्ष्या मामांची लेक

Last Updated:

स्वानंदी आणि अभियन यांच्याबरोबर रविंद्र बेर्डे यांचं नातं फार घट्ट होतं.  दोघांसाठी ते वडिलांसमान होते.

swanandi berde
swanandi berde
मुंबई, 13 डिसेंबर : मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं आज निधन झालं. रविंद्र बेर्डे यांनी अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीत काम केलं. कधी खट्याळ बाप, कधी हवालदार तर कधी व्हिलन देखील त्यांनी साकारला. आपल्या कॉमेडीनं त्यानी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. रविंद्र बेर्डे यांच्या निधनानं मराठी इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. रविंद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मोठे भाऊ होते. लक्ष्या मामांच्या मुलांना म्हणजे स्वानंदी आणि अभिनय यांना त्यांनी वडिलांचं प्रेम दिलं. काकांच्या मृत्यूनंतर स्वानंदी बेर्डे भावुक झाली. सोशल मीडियावर एक भावुक करणारा फोटो तिनं शेअर केला आहे.
रविंद्र बेर्डे त्यांच्या जाण्यानं बेर्डे कुटुंबात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. स्वानंदी आणि अभिनय यांच्या आयुष्यात त्यांचं खूप महत्त्वाचं स्थान होतं. लक्ष्या मामांच्या निधनानंतर ते त्यांच्यासाठी खूप मोठा आधार होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनाच्या 19 वर्षांनी आता काकांचं देखील निधन झाल्यानं स्वानंदी आणि संपूर्ण बेर्डे कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
advertisement
दरम्यान रविंद्र बेर्डे हे गेली अनेक वर्ष घशाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्यावर मुंबईच्या टाटा रूग्णालयात उपचार सुरू होते. अनेक वर्ष त्यांच्यावर उपचार घेत होते. दरम्यान काही दिवसांआधी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याचं निधन झालं.
advertisement
स्वानंदी आणि अभियन यांच्याबरोबर रविंद्र बेर्डे यांचं नातं फार घट्ट होतं.  दोघांसाठी ते वडिलांसमान होते. दोघांचं ही आपल्या काकांवर जिवापाड प्रेम होतं. स्वानंदीनं नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काकांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात स्वानंदी आणि अभिनय यांनी रविंद्र बेर्डे यांना मिठी मारली आहे. रविंद्र बेर्डे यांनीही दोघआंचा हात घट्ट पकडला आहे. त्यांची तब्येत थोडी खालावल्यासारखी दिसत असून त्यांच्या नाकात देखील ट्यूब लावल्याचं दिसतंय. हा फोटो शेअर करत स्वानंदीनं ब्रोकन हार्ट इमोजी शेअर केला आहे.
advertisement
रविंद्र बेर्डे यांनी 'चंगू मंगू', 'धमाल बाबल्या गणप्याची', 'एक गाडी बाकी अनाडी', 'खतरनाक', 'होऊन जाऊदे', 'हमाल दे धमाल', 'थरथराट', 'धडाकेबाज', 'गंमत जंमत', 'झपाटलेला' सारख्या दमदार सिनेमात काम केलं होतं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
वडिलांनंतर 19 वर्षांनी काकांचंही निधन; रवींद्र बेर्डेंच्या आठवणीत भावुक झाली लक्ष्या मामांची लेक
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement