ऐश्वर्यासोबत घटस्फोटाची चर्चा, अभिनेता मिस्ट्री गर्लसोबत दिसला; 4 वर्षात मोडणार संसार?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
आजकाल लग्नाच्या काही वर्षातच सेलिब्रिटी कपल घटस्फोट घेताना दिसतात. आता आणखी एका कपलच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यातच अभिनेत्याचा मिस्ट्री गर्लसोबत व्हिडीओ समोर आलाय.
मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या या जोडीने अनेकांची मने जिंकली. मात्र आता या कपलमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं समोर येतंय. ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना अभिनेता एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
गेल्या काही आठवड्यांपासून नील आणि ऐश्वर्या वेगळे राहत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दोघेही सोशल मीडियावर एकत्र पोस्ट करत नाहीत, तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दिसत नाहीत. त्यात भर म्हणजे अलीकडेच नील भट्ट एका मिस्ट्री गर्लसोबत मुंबईत फिरताना दिसला, आणि यानंतर अफवांना आणखी उधाण आलं.
advertisement
पापाराझींनी नीलला त्या तरुणीसोबत पाहताच फोटो काढण्याचा प्रयत्न केला, पण अभिनेत्याने कॅमेऱ्यांपासून नजर चुकवत गाडीने तात्काळ निघून गेला. त्याच्यासोबत असलेली ती तरुणी मात्र वेगळ्या दिशेने चालत गेली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. काही चाहत्यांनी नीलचा बचाव करत “ती दोघांची कॉमन फ्रेंड आहे” असं सांगितलं, तर इतरांनी अभिनेत्यावर पत्नीशी फसवणुकीचा आरोप केला.
advertisement
advertisement
दरम्यान, ऐश्वर्या शर्मानेही काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कबूल केलं होतं की, "आमच्यात काही गोष्टींवरून मतभेद आहेत, पण आम्ही आमचं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहोत." आता या दोघांमधील नातं खरंच तुटण्याच्या मार्गावर आहे का, की फक्त गैरसमजांचा गुंता आहे याविषयी काही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2025 6:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
ऐश्वर्यासोबत घटस्फोटाची चर्चा, अभिनेता मिस्ट्री गर्लसोबत दिसला; 4 वर्षात मोडणार संसार?