'चिऊताई चिऊताई दार उघड', अमृता खानविलकरचं पहिलं आयटम सॉंग! गश्मीर महाजनीसोबतचा पाहा VIDEO

Last Updated:

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि टॅलेंटेड अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते.

अमृता खानविलकरचं पहिलं आयटम सॉंग! पाहा VIDEO
अमृता खानविलकरचं पहिलं आयटम सॉंग! पाहा VIDEO
मुंबई :  मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि टॅलेंटेड अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. आता ती एका नव्या रूपात दिसणार आहे. ‘सुशीला-सुजीत’ या आगामी चित्रपटात अमृता तिचे पहिले आयटम सॉंग करत आहे. तिचं हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
अमृता ने तिच्या मित्र मंडळीच्या सिनेमांत एक खास गाणं केलं असून "चिऊताई चिऊताई दार उघड" असं या गाण्याचं नाव आहे. अमृता तिच्या अभिनय प्रवासात पहिल्यांदा आयटम साँग करणार आहे. कायम उत्तम भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य करून राहणारी अभिनेत्री असली तरी तिच्या नृत्याचे सगळेच चाहते आहेत यात शंका नाही.
advertisement
सुपरहिट लावण्या सादर केल्यानंतर आता अमृता या चित्रपटात पहिल्यांदा आयटम साँग करणार असून तिच्या नृत्याची पुन्हा एकदा जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘सुशीला- सुजीत’मध्ये हे आयटम साँग नक्कीच काहीतरी कमाल आहे आणि नेहमीपेक्षा वेगळ्या रूपात अमृता या गाण्यात दिसतेय. तिचा नवा लूक आणि नवं नाव यातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आजवर अमृताने अनेक सुपरहिट लावण्या सादर केल्या आणि त्यातून प्रेक्षकांना मोहित केलं आहे. आता अमृता या नव्या आयटम साँग मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकणार यात शंका नाही.
advertisement
अमृता या गाण्यात तिच्या आवडत्या मित्रा सोबत म्हणजे गश्मीर महाजनी सोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. ‘सुशीला सुजीत’मध्ये "चिऊताई चिऊताई दार उघड" हे गाणं नक्कीच धम्माल करून जाणार आहे असं दिसतंय.
advertisement
वैविध्यपूर्ण भूमिका असो किंवा कोणताही नृत्यप्रकार अमृता कायम तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांना मोहित करत आली आहे आणि आता पुन्हा एकदा या पहिल्या वहिल्या आयटम साँग मधून अमृता प्रेक्षकांना खिळवून ठेवणार यात शंका नाही!
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'चिऊताई चिऊताई दार उघड', अमृता खानविलकरचं पहिलं आयटम सॉंग! गश्मीर महाजनीसोबतचा पाहा VIDEO
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement