Chhaava Movie: छावाच्या शूटिंगवेळी अक्षय खन्नाशी बोललाच नाही संतोष जुवेकर, म्हणाला, 'मी त्याच्याकडे बघतही नव्हतो'

Last Updated:
Chhaava Movie: 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे.
1/7
'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई करून वर्षातील सर्वात मोठी ओपनिंग मिळवली. चित्रपटाने ऐतिहासिक कथानक, दमदार अभिनय आणि तगड्या दिग्दर्शनामुळे प्रेश्रकांच्या मनावर आपली छाप पाडली.

advertisement
2/7
 विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने मोठा गल्ला जमवला. या सिनेमात अनेक मराठी कलाकारही होते. यापेकीच एक म्हणजे संतोष जुवेकर.

3/7
मराठी अभिनेता संतोष जुवेकरने छावा सिनेमात रायाजीची भूमिका साकारली. एवढ्या मोठ्या आणि ऐतिहासिक सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे संतोष जुवेकर स्वतःला भाग्यश्याली समजतो. त्याने अनेक मुलाखतींमध्ये याविषयी उल्लेख केला. याशिवाय त्याने या सिनेमात काम करण्याचा अनुभव शेअर केला.

4/7
 नुकतंच न्यूज 18 लोकमतशी बोलताना संतोषने त्याने अक्षय खन्नासोबतचाही अनुभव सांगितला. संतोष जुवेकर म्हणाला, छावाच्या शूटिंगवेळी तो अक्षय खन्नाशी बोललाच नाही. यामागचं कारणही त्याने सांगितलं.

5/7
संतोष जुवेकर म्हणाला, आरंगजेब, आम्ही जे जे मुघल होते ना, जे मुघलांची पात्र करत होते त्यांच्याशी मी बोलायचो नाही. माहित नाही का, शेवटी ते कलाकारच आहेत पण मी तरी नाही बोललो कोणाशीच. पूर्ण शूटिंगवेळी मी कोणाशीच नाही बोललो.

6/7
 मी सरांना भेटायला गेलो होतो तेव्हा औरंगजेब अक्षय खन्नाच्या काही सीनचं शूट सुरु होतं. तर मी सरांना भेटलो आणि तिकडे अक्षय खन्ना बसला होता. मी सरांना भेटून निघालो त्यांचे असिस्टंट मला बोलले अरे अक्षय सर. मी बघितलंही नाही तिकडे. मी बघूच शकत नाही.

7/7
संतोष पुढे म्हणाला, मला काही अक्षय खन्नावर राग नाही त्याने उत्तम काम केलं आहे पण माहित नाही मला नाही बोलावसं वाटलं त्यांच्याशी. मी सेटवर सुद्धा हेडरेट करत नव्हतो पण नव्हतो बोलत. मेकअप काढून जरी आले तरी मी बोलायचो नाही. आमचं अष्टक होतं त्यांच्यात बॉन्टिंग होतं.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement