Ankita Walawalkar: अंकिता वालावलकरने घेतली राज ठाकरेंची भेट, शिवतीर्थावर जाऊन दिलं लग्नाचं निमंत्रण

Last Updated:

Ankita Walawalkar: बिग बॉसमधून बाहेर पडल्यापासून कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरची लग्नघाई सुरू आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या लग्नाचे अपडेट देत असते.

अंकिता वालावलकरने घेतली राज ठाकरेंची भेट
अंकिता वालावलकरने घेतली राज ठाकरेंची भेट
मुंबई : बिग बॉसमधून बाहेर पडल्यापासून कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरची लग्नघाई सुरू आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या लग्नाचे अपडेट देत असते. तिनं लग्नपत्रिकेचा फोटोही स्टोरीवर शेअर केला होता. आता ती लग्नाची पत्रिका वाटण्यात बिझी आहे. अनेक कलाकार मित्रांना पत्रिकेचे वाटप केल्यानंतर अंकिता होणाऱ्या नवऱ्यासोबत राज ठाकरेंच्या घरी पोहोचली. अंकिताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही लग्नाचे निमंत्रण दिले आहे.
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर होणाऱ्या नवऱ्यासोबत पत्रिका घेऊन राज ठाकरेंच्या घरी पोहोचली. तिनं राज ठाकरे यांना लग्नासाठी खास निमंत्रण दिले आहे. या भेटीचा फोटोही तिने इंस्टा स्टोरीवर शेअर केला होता. शिवतीर्थावर जाऊन तिने राज ठाकरे आणि पत्नी शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली. लग्नाची पत्रिका दिली.
advertisement
अंकिता वालावलकरच्या लग्नाची तयारी एकदम जोरात सुरू आहे. ती सोशल मीडियावर आणि युट्यूबवर लग्नाची अपडेट देत असते. मात्र अद्याप लग्नाची तारीख तिने सांगितलेली नाहीये. चाहते तिच्या लग्नासाठी फार उत्सुक आहेत. अंकिताचा होणारा नवरा कुणाल भगत हा गायक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक आहे.
Ankita Prabhu Walawalkar
Ankita Prabhu Walawalkar
advertisement
अंकिता वालावलकर ही एक सोशल मीडिया सेन्सेशन आणि बिझनेस वुमनही आहे. बिग बॉस मराठी 5 ने तिची लोकप्रियता आणखीनच वाढवली. बिग बॉसमध्ये गेल्यावर ती कोकण हार्टेडची महाराष्ट्र हार्टेड गर्ल झाली.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ankita Walawalkar: अंकिता वालावलकरने घेतली राज ठाकरेंची भेट, शिवतीर्थावर जाऊन दिलं लग्नाचं निमंत्रण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement