Pranit Hatte Wedding: तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज..!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Pranit Hatte Wedding: मराठी कलासृष्टीतील पहिली तृतीयपंथी अभिनेत्री म्हणजे प्रणित हाटे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.
मुंबई: मराठी कलासृष्टीतील पहिली तृतीयपंथी अभिनेत्री म्हणजे प्रणित हाटे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. अशातच प्रणित हाटेने एक गुडन्यूज शेअर केलीय. अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रणितने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. प्रणितच्या लग्नाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
तृतीयपंथी अभिनेत्री प्रणित हाटेने 1 फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एक नवीन सुरुवात…”, नवऱ्यासोबत दोन फोटो शेअर करत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी शेअर केली. प्रणितच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
advertisement
प्रणितने तिच्या करिअरची सुरुवात “कारभारी लयभारी” या मालिकेतून केली. या मालिकेत तिने गंगाची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका खूप फेमस झाली आणि लोक तिला गंगा म्हणून ओळखू लागले. या भूमिकेनं तिला एक नवी ओळख मिळवून दिली. याशिवाय प्रणितने रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. “रिअॅलिटी शो डान्सिंग क्वीन” मध्ये प्रणितने सहभाग घेतला होता. यामध्ये तिने आपल्या डान्सिंग कौशल्याने अनेकांची मने जिंकली.
advertisement
advertisement
दरम्यान, प्रणित हाटे लग्नबंधनात अडकली असून तिच्यावर सध्या शुभेच्छा आणि आशिर्वादाचा वर्षाव होत आहे. तिच्या नव्या आयुष्यासाठी चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 02, 2025 11:49 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pranit Hatte Wedding: तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज..!