AR Rahman Divorce : एआर रहमानचे पत्नीसोबतचे सुर बिघडले, लग्नाच्या 29 वर्षांनंतर बायको सायरा बानूपासून घटस्फोट
- Published by:Devika Shinde
Last Updated:
AR Rahman Divorce एआर रहमानची पत्नी सायरा बानोने आपल्या पतीपासून वेगळे झाल्याची घोषणा केली.
मुंबई : बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध कपलचा घटस्फोट झाला आहे. याची माहिती कपलने स्वत: दिली. खरंतर हे कपल प्रसिद्ध संगितकार एआर रहमान आणि त्यांची बायको सायरा बानू आहे. एआर रहमान यांच्या बायकोनं याबद्दल प्रेससमोर खुलासा केला आहे.
एआर रहमानची पत्नी सायरा बानोने आपल्या पतीपासून वेगळे झाल्याची घोषणा केली. मंगळवारी रात्री म्हणजे 19 नोव्हेंबरला प्रेसला एक निवेदन जारी केले आणि पुष्टी केली की, ती संगीत उस्ताद एआर रेहेमान पासून (AR Rahman divorce) विभक्त होत आहे. या जोडप्याच्या लग्नाला 29 वर्षे झाली होती.
इंडिया टुडेला दिलेल्या निवेदनात, “लग्नाच्या अनेक वर्षानंतर, श्रीमती सायरा यांनी त्यांचे पती श्री ए आर रहमान यांच्यापासून वेगळे (AR Rahman divorce) होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या नात्यातील महत्त्वपूर्ण भावनिक ताणानंतर आला आहे. एकमेकांवर त्यांचे नितांत प्रेम असूनही, या जोडप्याला असे आढळून आले आहे की तणाव आणि अडचणींमुळे त्यांच्यात एक अपूरणीय दरी निर्माण झाली आहे, जी यावेळी कोणत्याही गोष्टीने भरून काढता येणार नाही."
advertisement
काळजावर दगड ठेवून आपण हा निर्णय घेतल्याचे सायराने आवर्जून सांगितले, शिवाय त्यांनी आव्हानात्मक काळात लोकांकडून गोपनीयतेची आणि समजूतदारपणाची विनंती केली आहे.
रहमान यांचे 1995 मध्ये सायराशी लग्न झाले. या जोडप्याने अरेंज मॅरेज केलं होतं. एकदा सिमी गरेवालच्या चॅटमध्ये रहमान यांनी उघड केलं की त्यांच्या आईने सायरा बानोशी त्यांचं लग्न निश्चित केलं आहे. त्यांनी कबूल केलं की त्याच्याकडे जाण्यासाठी आणि स्वत: साठी वधू शोधण्यासाठी वेळ नाही, पण त्यांच्या आईने त्यांच्यासाठी खूप चांगलं स्थळ शोधलं.
advertisement
ते म्हणाले, 'मी रंगीला, बॉम्बेसारखे चित्रपट करत होतो त्यामुळे मी त्यात व्यस्त होतो. पण, मला माहित होतं की माझ्यासाठी लग्न करण्याची हीच योग्य वेळ आहे. मी 29 वर्षांचा होतो आणि मी माझ्या आईला सांगितले. मी म्हणालो, 'मला तूम्ही वधू शोधा'.'
आता असं अचानक त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर, त्यामागचं कारण समजू शकलेलं नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 19, 2024 10:17 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
AR Rahman Divorce : एआर रहमानचे पत्नीसोबतचे सुर बिघडले, लग्नाच्या 29 वर्षांनंतर बायको सायरा बानूपासून घटस्फोट






