advertisement

आजोबांच्या मृत्यूनंतर आईसाठी लेक बनला 'बाबा'; खचलेल्या मलायकाला धीर देताना दिसला अरहान

Last Updated:

वडिलांना शेवटचं पाहण्यासाठी निघालेल्या मलायकाला अश्रू अनावर झाले आहेत. यावेळी तिचा एकुलता एक मुलगा अरहान खान हा तिला धीर देताना दिसला.

मलायका अरोरा
मलायका अरोरा
मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांचं बुधवारी निधन झालं. वांद्रे येथील घराच्या बाल्कनीतून उडी मारून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनिल मेहता यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. मलायका देखील वडिलांच्या जाण्यानं खचली आहे. वडिलांना शेवटचं पाहण्यासाठी निघालेल्या मलायकाला अश्रू अनावर झाले आहेत. यावेळी तिचा एकुलता एक मुलगा अरहान खान हा तिला धीर देताना दिसला. मायलेकाचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
वडिलांनी आत्महत्या केली तेव्हा मलायका मुंबईत नव्हती. तिला माहिती मिळताच ती घरी पोहाचली. वडिलांच्या निधनाच्या आदल्या रात्री दोघी बहिणी त्यांना भेटायला घरी गेल्या होत्या. त्या रात्री मलायका खूप अस्वस्थ वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी देखील अनिल मेहता यांनी मृत्यूआधी मलायका आणि अमृता यांना फोन केला होता. मी खूप थकलो आहे असं ते म्हणाले.
advertisement
वडिलांच्या अकाली जाण्यानं मलायकाला खूप मोठा धक्का बसला आहे. मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यातील नातेसंबंधांमध्ये खूप स्ट्रगल करताना दिसली आहे. काही दिवसांपासून तिच्या आणि अर्जून कपूरच्या ब्रेकअपच्या चर्चा पाहायला मिळत होत्या. अशातच तिच्या वडिलांच्या मृत्यूनं तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
advertisement
आजोबांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर अरहान देखील त्यांच्या घरी आली. अरहानच्या आधी त्यांचे वडील अरबाज खान देखील मलायकाच्या घरी पोहोचला होता. अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटानंतरही ते मुलगा अरहानसाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. अनिल मेहता यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळताच मलायकाच्या मदतीला अरबाज खान पहिल्यांदा पोहोचलेला पहायला मिळाला.
अरबाजनंतर त्याचा मुलगा अरहान देखील आईला भावनिक सपोर्ट करताना दिसला. इमारतीच्या बाहेर मलायका रडताना दिसत आहे. अरहान तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर देताना दिसतोय.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
आजोबांच्या मृत्यूनंतर आईसाठी लेक बनला 'बाबा'; खचलेल्या मलायकाला धीर देताना दिसला अरहान
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement