advertisement

मलायका अरोराच्या वडिलांच्या मृत्यूचं कारण काय? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा

Last Updated:

malaika arora father anil mehta death reason : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांचा मृत्यू झाला. आत्महत्या करत त्यांनी आयुष्य संपवलं अशी प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे.

मलायका अरोरा आणि तिचे वडील
मलायका अरोरा आणि तिचे वडील
मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांनी बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली. अनिल मेहता यांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी खरंच आत्महत्या केली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. दरम्यान या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. अनिल मेहता यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. प्राथमिक अहवालात मृत्यूचं कारण मल्टीपल इन्जुरी असं नमूद करण्यात आलं आहे. त्यांचे पोस्टमार्टम रिपोर्ट व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
मलायका अरोराच्या वडिलांनी 12 सप्टेंबर 204 राजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारात घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली अशी प्राथमिक माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी जवळच्या कूपर रुग्णालयात पाठवला. बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारात अनिल मेहता यांचं पोस्टमार्टम करण्यात आलं. त्यांचे प्राथमिक रिपोर्ट आले असले तरी मल्टीपल इन्जुरी नेमकी कशामुळे झाली याचं कारण समोर आलेलं नाही.
advertisement
मलायकाच्या वडिलांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांनी आत्महत्या केली तेव्हा त्यांची पत्नी म्हणजेच मलायकाची आई जॉयस पॉलीकार्प या घरीच होत्या. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितलं, अनील अरोरा हे दररोज सकाळी बाल्कनीमध्ये पेपर वाचत बसायचे. ते दररोज बाल्कनीमध्ये चप्पल घालून खुर्चीत बसायचे आणि पेपर वाचायचे पण आज त्यांची चप्पल लिविंग रुममध्येच होती. जॉयस पॉलीकार्प त्यांना शोधण्यासाठी बाल्कनीच्या दिशेने गेले तेव्हा ते तिथे नव्हते. जॉयस पॉलीकार्प यांनी बाल्कनीतून खाली वाकून पाहिलं तेव्हा बिल्डिंगचा वॉचमन ओरडत होता.
advertisement
अनिल मेहता यांनी आत्महत्या करण्याआधी त्यांच्या दोन्ही मुलींना फोन केला होता अशी माहिती पोलिसांना तपासात समोर आली. अनिल मेहता यांनी मुलगी मलायका आणि अमृता यांना फोन केला होता. "मी आजारी आहे आणि आता मी थकलो आहे", असं ते मुलींशी फोनवर बोलले होते. यावरुन अनिल मेहता हे डिप्रेशनमध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला असावा असा अंदाज लावण्यात येत आहे पण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
मलायका अरोराच्या वडिलांच्या मृत्यूचं कारण काय? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement