Disha Vakani: कधीकाळी B- ग्रेड सिनेमात काम करायची दयाबेन, आता झालीये 2 मुलांची आई, ओळखूही येईना
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचे खळखळून मनोरंजन करणाऱ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मालिकेतले कलाकार कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. दया भाभीचे पात्र साकारणारी दिशा वाकानी सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. दिशाच्या नव्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले असून सध्या तिच्या नव्या फोटोची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
advertisement
2017 साली मालिकेतून एक्झिट घेतलेल्या दिशाने 8 वर्षे झाले आहेत, अजूनही ती मालिकेमध्ये परतलेली नाही. अनेकदा ती मालिकेमध्ये येणार असल्याची चर्चा सुद्धा झाली होती. पण अद्यापही ती प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही. अशातच दिशाचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती ओळखूही येत नाहीये.
advertisement
advertisement
advertisement
जरीही दिशाला 'तारक मेहता का...' शोने स्टारडम दिलं असलं तरीही ती फार वर्षांपासून स्ट्रगल करतेय. फार कमी वयापासून तिने नाटकांमध्ये काम करायला सुरूवात केली. त्याचं श्रेय ती कायमच वडील भीम वकानी यांना देते. ते गुजराती इंडस्ट्रीमध्ये कलाकार होते. फक्त मालिकेतच नाही तर, चित्रपटांमध्येही दिशाने काम केले.
advertisement
advertisement









