advertisement

Mr. India मयंक पवारसाठी ढसाढसा रडली होती सनी लिओनी, Splitsvilla मध्ये असं घडलेलं तरी काय? शाहरुख खानशीही खास नातं

Last Updated:
Mr. India Mayank Pawar Death: 'स्प्लिट्सविला ७' मध्ये एक क्षण असा आला होता की खुद्द शोची होस्ट सनी लिओनी मयंकसाठी ढसाढसा रडली होती.
1/9
मनोरंजन विश्व आणि फिटनेस इंडस्ट्रीला आज सुन्न करणारी एक बातमी समोर आली आहे. आपल्या पिळदार शरीराने आणि शांत स्वभावाने चाहत्यांच्या मनात घर करणारा 'स्प्लिट्सविला सीझन ७' चा स्पर्धक मयंक पवार याचे निधन झाले आहे.

2/9
अवघ्या ३७ व्या वर्षी मयंकने जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एक ऊर्जावान तरुण, जो अनेकांसाठी प्रेरणेचा स्रोत होता, तो इतक्या लवकर कसा काय जाऊ शकतो? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

3/9
मयंकच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून त्याच्या निधनाची दुःखद वार्ता देण्यात आली.
मयंकच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून त्याच्या निधनाची दुःखद वार्ता देण्यात आली. "एक भाऊ, एक चॅम्पियन, एक मार्गदर्शक आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान असलेला मयंक आता आपल्यात नाही," अशा शब्दांत त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. मयंकच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र या बातमीने त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
advertisement
4/9
मयंक पवार खऱ्या अर्थाने घराघरांत पोहोचला तो 'स्प्लिट्सविला ७' मुळे. रिएलिटी शो म्हटलं की भांडण-तंटा आणि आरडाओरडा हे समीकरण असतं, पण मयंक याला अपवाद होता. त्याने संपूर्ण शोमध्ये अत्यंत सभ्यपणे आणि प्रामाणिकपणे आपला खेळ खेळला.

5/9
ज्यावेळी मयंक या शोमधून बाहेर पडला, तो क्षण त्या सीझनमधील सर्वात भावूक क्षण ठरला होता. मयंकला निरोप देताना खुद्द सनी लिओनी आपले अश्रू रोखू शकली नव्हती.

6/9
तिने त्याला मिठी मारून निरोप दिला होता, तर सह-होस्ट निखिल चिनप्पानेही त्याला प्रेमाने मिठीत घेतले होते. एका स्पर्धकाबद्दल होस्टच्या मनात इतका आदर असणे, हे मयंकच्या व्यक्तिमत्त्वाचे यश होते.

7/9
मयंक केवळ पडद्यावरचा अभिनेता नव्हता, तर तो फिटनेस क्षेत्रातील एक दिग्गज नाव होता. त्याने तब्बल ७ वेळा Mr. India हा किताब पटकावला होता. शरीराची कमालीची सौष्ठव आणि शिस्तबद्ध जीवनशैली ही त्याची ओळख होती. एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर म्हणून त्याने अनेक नवोदित खेळाडूंना घडवले.

8/9
मयंकच्या निधनानंतर त्याची एक खास ओळख पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मयंक हा केवळ फिटनेस आयकॉन नव्हता, तर त्याने बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान याच्यासोबतही काम केले होते. 'हॅप्पी न्यू इयर' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मयंक पवारने शाहरुख खानचा बॉडीगार्ड म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

9/9
मिळालेल्या माहितीनुसार, मयंकची प्रार्थना सभा उद्या, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत वाल्मिकी मंदिर, संगम पार्क, राणा प्रताप बाग येथे आयोजित करण्यात आली आहे. त्याचे मित्र, कुटुंबीय आणि चाहते त्याला अंतिम निरोप देण्यासाठी तिथे उपस्थित राहतील.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement