advertisement

'आयुष्यात खूप अडचणी येताएत...', 'त्या' खास व्यक्तीच्या आठवणीत इमोशनल झाला अर्जुन कपूर, सांगितली मनातील खंत

Last Updated:

Arjun Kapoor : अनेकदा अर्जुन ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतो, पण आज मात्र त्याने आपल्या मनातील सर्व खदखद एका भावूक पोस्टद्वारे बोलून दाखवली आहे.

News18
News18
मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही काळापासून त्याच्या सिनेमांपेक्षा सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे जास्त चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांवरून, तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरून नेटिझन्स त्याला सतत लक्ष्य करत असतात. अनेकदा अर्जुन या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण आज मात्र त्याने आपल्या मनातील सर्व खदखद एका भावूक पोस्टद्वारे बोलून दाखवली आहे. आज, ३ फेब्रुवारी रोजी अर्जुनची आई मोना शौरी कपूर यांचा वाढदिवस आहे. आईच्या आठवणीत बुडालेल्या अर्जुनने स्वतःच्या संघर्षावर भाष्य करत ट्रोलर्सना एक प्रकारे शांत उत्तर दिलं आहे.

लाडक्या आईसाठी अर्जुनची भावुक पोस्ट

अर्जुनने इन्स्टाग्रामवर आईसोबतचा एक लहानपणीचा गोड फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने लिहिलेले शब्द तुमचं काळीज पिळवटून टाकतील. अर्जुन म्हणाला, "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई! आज तुझी उणीव प्रकर्षाने जाणवतेय. खरं सांगायचं तर, गेल्या काही दिवसांपासून आयुष्य माझ्यासाठी थोडं कठीण झालं आहे. पण काही हरकत नाही, मी याआधीही अशा प्रसंगांचा सामना केला आहे आणि पुन्हा एकदा ताठ मानेने उभा राहीन."
advertisement
अर्जुनने आपल्या पोस्टमध्ये थेट ट्रोलिंगबाबत काहीही म्हटलं नसलं, तरी "आयुष्य कठीण आहे" असं म्हणताना त्याचा रोख त्याच्यावर होणाऱ्या टीकेकडेच असल्याचं स्पष्ट जाणवतंय. त्याने पुढे लिहिलं, "कोणत्याही परिस्थितीत शांत राहून, सन्मानाने आणि शालीनतेने संकटांशी कसं झुंजायचं, हे तूच मला शिकवलं आहेस. आपण दोघं मिळून या कठीण काळावर नक्कीच मात करू. आई, आपण पुन्हा एकदा एकत्र भेटू आणि तुझा वाढदिवस साजरा करू. तुझा लाडका मुलगा, अर्जुन."
advertisement












View this post on Instagram























A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)



advertisement

अर्जुनच्या पोस्टवर सेलेब्सच्या कमेंट्स

अर्जुनची ही पोस्ट पाहून केवळ त्याचे चाहतेच नाही, तर संपूर्ण बॉलीवूड हळहळलं आहे. त्याची बहीण जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांनी कमेंट सेक्शनमध्ये हार्ट इमोजी पोस्ट करून भावाचं सांत्वन केलं. काका संजय कपूर, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि वीर पहाडिया यांनीही अर्जुनला धीर दिला आहे. अर्जुनने आपल्या आईला दिलेली ही श्रद्धांजली सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे.
advertisement
मोना शौरी कपूर यांचं २०१२ मध्ये कॅन्सरमुळे निधन झालं होतं. तेव्हापासून अर्जुन आणि त्याची बहीण अंशुला यांनी स्वतःला सावरलं आहे. वडील बोनी कपूर यांचं दुसरं लग्न आणि त्यानंतर आयुष्यात आलेल्या चढ-उतारांमध्ये अर्जुनने नेहमीच आपल्या कुटुंबाला सांभाळून घेतलं आहे. आजच्या त्याच्या पोस्टमधून पुन्हा एकदा त्याच्यातील एक हळवा पण तितकाच खंबीर मुलगा सर्वांना पाहायला मिळाला.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'आयुष्यात खूप अडचणी येताएत...', 'त्या' खास व्यक्तीच्या आठवणीत इमोशनल झाला अर्जुन कपूर, सांगितली मनातील खंत
Next Article
advertisement
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; भर न्यायालयात 'प्रायव्हसी'चा फुगा फुटला, 213 कोटींचा दंड
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; 213 कोटींचा दंड
  • WhatsAppच्या प्रायव्हसी पॉलिसीवर कोर्टाचा घणाघात

  • आम्हालाच तुमची पॉलिसी समजत नाही, तर गरिबांचं काय?

  • 213 कोटींचा दंड, तरीही डेटा शेअरिंग

View All
advertisement