चल ग सखे पंढरीला…! आषाढी वारीनिमित्त तरुणांनी गायलं भक्तीगीत, तुम्हालाही आवडेल हा Video
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Vitthal Bhajan: मुंबईतील काही तरुण-तरुणींनी एकत्र येत एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. जुन्या भक्तीगीत आणि बालगीतांना नवे रुप दिलेले त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या वारीची आस लागलेली असताना, शाळा आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही तरुणांनी एकत्र येत एक विशेष भक्तीमय उपक्रम हाती घेतला आहे. जुन्या भक्तीगीतांना आणि बालगीतांना नवे रूप देऊन त्या गाण्यांना नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा त्यांचा हेतू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ‘चल ग सखे पंढरीला’ हे गीत सादर केलं असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
"गाणं, वाद्य आणि भक्ती हा आमचा गाभा आहे. हल्ली आपण पारंपरिक भक्तीगीतं आणि बडबडगीतं विसरत चाललो आहोत. तीच परंपरा पुन्हा नव्या शैलीत जिवंत करण्याचा आमचा प्रयत्न आहे," असं या ग्रुपमधील तरुणांनी सांगितलं. 'चल ग सखे पंढरीला' हे पारंपरिक गीत त्यांनी नवीन संगीत संयोजनासह सादर केलं आहे. यामध्ये गायन, वाद्यवादन, ध्वनीमिश्रण (mixing) आणि व्हिडिओ निर्मिती ही सर्व प्रक्रिया त्यांनी स्वतःच केली आहे. हे गीत सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यावर अनेकांनी त्याचे कौतुक केलं असून, विशेषतः तरुणांमध्ये त्याला उत्साही प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
या उपक्रमातून केवळ भक्तीगीतांचा प्रसार होत नाही, तर नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याचा महत्त्वाचा प्रयत्न होत आहे. संगीत, श्रद्धा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधत ही तरुण मंडळी नव्या वाटा चोखाळत आहेत. आषाढीच्या भक्तिभावपूर्ण वातावरणात 'चल ग सखे पंढरीला' या नव्या भक्तीगीतातून विठुरायाच्या ओढीला नव्या पिढीचा साज चढला आहे. संगीत, श्रद्धा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम साधत या तरुणांचं हे पाऊल खरंच प्रेरणादायी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 05, 2025 11:20 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
चल ग सखे पंढरीला…! आषाढी वारीनिमित्त तरुणांनी गायलं भक्तीगीत, तुम्हालाही आवडेल हा Video









