मैत्रीपलिकडे निवेदिता आणि प्रिया बेर्डे यांच्यात आहे मामी-भाचीचं नातं, कसं काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे यांच्यातही खास नातं आहे.
मुंबई : अशोक सराफ- निवेदिता सराफ, सचिन पिळगावकर- सुप्रिया पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे-प्रिया बेर्डे अशा अनेक कलाकारांच्या जोड्या 80-90च्या दशकात मराठी इंडस्ट्रीत गाजल्या. आजही हे कलाकार प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहेत. या जोड्यांनी एकाहून एक दर्जेदार सिनेमे सिनेसृष्टीला दिले. अशी ही बनवा बनवी, थरथराट, नवरी मिळे नवऱ्याला सारख्या अनेक सिनेमांमध्ये या जोड्या प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. या जोड्यांमधील एक जोडी देखील एकमेकांचे नातेवाईक आहेत.
अभिनेत्री प्रिया बेर्डे अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची भाची आहे असं सांगितलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. प्रिया आणि निवेदिता या दोघी अभिनेत्री एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी आहेत. पण त्यांच्यात मामी आणि भाचीचं नातं देखील आहे. स्वत: निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे यांनी हा खुलासा केला आहे. चला हवा येऊ द्याच्या एका एपिसोडमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या तेव्हा त्यांना हा किस्सा सांगितला.
advertisement
प्रिया बेर्डे यांनी एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, थरथराट सिनेमाच्या वेळेस सगळ्यांचं पॅकअप झालं. त्यावेळी निवेदिता सराफ या रडत असल्याचं प्रिया बेर्डे यांना दिसलं. त्यांनी निवेदिता यांना विचारलं की, "काय झालं?" त्यावर रडत रडत निवेदिता यांनी उत्तर दिलं, "मला, मला अशोकची आठवण येतेय".
advertisement
त्यावेळी "अशोक म्हणजे कोण" असा प्रश्न प्रिया बेर्डे यांना पडला. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारलं की "अशोक म्हणजे कोण?" त्यावर ते म्हणाले "अग मामा, अशोक मामा". त्यावेळी प्रिया बेर्डे एकदम हबकल्या आणि म्हणाल्या, "मामा, म्हणजे ही मामी".
प्रिया बेर्डे यांनी सांगितलेल्या या किस्स्यानंतर निवेदिता सराफ यांनी त्यांच्या प्रिया बेर्डे यांच्या नात्यामागचं सत्य सांगितलं. त्या म्हणाल्या, "हो कारण प्रियासाठी अशोक खरोखर मामा आहे. लता ताई म्हणजेच प्रिया बेर्डे यांच्या आई अशोक सराफ यांना राखी बांधायच्या. अशोक सराफ यांनी प्रिया बेर्डे यांना लहानपणापासून पाहिलं आहे. अनेकदा प्रिया बेर्डे यांना अशोक सराफ यांनी कडेवर खेळवलं आहे".
advertisement
यावेळी बोलताना निवेदिता सराफ म्हणाल्या, "त्यामुळे मी तिची ऑफिशिअल मामी आहे. त्यामुळे मामी म्हणून मी आजही तिचे कान पिळू शकते. तिच्यासाठी अशोक खरोखरच मामा आहे".
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 01, 2024 10:32 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मैत्रीपलिकडे निवेदिता आणि प्रिया बेर्डे यांच्यात आहे मामी-भाचीचं नातं, कसं काय?


