कॅमेऱ्यात कैद झाला झुबीन गर्गचा मृत्यू, क्षणात गेला जीव, कमकुवत हृदयाच्या लोकांनी तर हा VIDEO पाहूच नका
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Jubin Garg Last Video : झुबीन गर्ग यांचा सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना मृत्यू झाला. झुबीनचा मृत्यूच्या काही सेकंद आधीचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मुंबई : 19 सप्टेंबर रोजी टॉलिवूड आणि बॉलिवूडला हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध आसामी संगीतकार झुबीन गर्ग याचं निधन झालं. सिंगापूरमध्ये फिरायला गेला असताना स्कूबा डायव्हिंग करताना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पाण्यात तरंगत होता. त्याला समुद्रातून बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. गर्गच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त होत असतानाच त्याचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. मृत्यूच्या काही सेकंद आधी त्याच्याबरोबर नेमकं काय घडलं हे दाखवणारा हा व्हिडीओ आहे.
सध्या सोशल मीडियावर जुबिन गर्गचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो फॅन्ससोबत बोलतोय आणि त्यानंतर पाण्यात उडी मारताना दिसत आहेत. लाइफ जॅकेट नीट करत तो समुद्रात उतरतो आणि थोडं पोहताना दिसतात. व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, झुबीनने पाण्यात उडी मारतो. काही सेकंद तो पोहोतो आणि थांबतो. पुन्हा पोहायला सुरुवात करतो आणि बाजूला उभ्या असलेल्या बोटीवर येऊन थांबतो. बोटीवर हात ठेवून वर येण्याचा प्रयत्न करत असतानाच तो धाडकन पाण्यात पडतो. त्याचे संपूर्ण हात हात ताठ होतात, हालचाल बंद होते. झुबीनचा हा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे.
advertisement
असमचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी X वर पोस्ट करून श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिलं की, सिंगापूरमध्ये पोस्टमार्टम झाल्यानंतर जुबिन गर्ग यांचं पार्थिव भारतीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं जाईल. त्यानंतर त्यांचं पार्थिव भारतात आणलं जाईल.
advertisement
জুবিন গাৰ্গৰ অন্তিমটো ভিডিঅ’৷ #ZubeenGargNoMore pic.twitter.com/WMcUsLGWr1
— Jyoti Prasad Nath জ্যোতি প্ৰসাদ নাথ (@xitoo27) September 19, 2025
जुबिन गर्ग सिंगापूरमध्ये नॉर्थ इस्ट फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करायला गेले होते. मात्र त्यांच्या कॉन्सर्टच्या आदल्या दिवशीच स्कूबा डाइविंग करताना त्याचा मृत्यू झाला. त्याला लगेचच CPR देऊन त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण शेवटी गायकाचा मृत्यू झाला.
advertisement
गायकाच्या अचानक निधनाने टॉलिवूड आणि बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या भावुक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 4:21 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
कॅमेऱ्यात कैद झाला झुबीन गर्गचा मृत्यू, क्षणात गेला जीव, कमकुवत हृदयाच्या लोकांनी तर हा VIDEO पाहूच नका