'शिकलेला असून नोकरी लागत नाही' मनोरुग्ण तरुणाकडून भाजप मंत्री अतुल सावेंच्या कार दगडफेक!

Last Updated:

गणेश शेजुळ नावाचा हा तरुण सावे यांच्या कार्यालयात आला. त्यांची भेट घेतली त्यानंतर बाहेर जाऊन त्याने कारवर दगड मारला. 

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती. सावे यांच्या जनसंपर्क कार्यालयात येणाऱ्या एका तरुणाने ही दगडफेक केल्याचं समोर आलं आहे. हा तरुण मनोरुग्ण असल्याचं निष्पन्न झालं आहे. 'शिकलेलो असून नोकरी लागत नाही असं म्हणत मनोरुग्णाने माझ्या वाहनावर दगडफेक केली' अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार,  अतुल सावे यांचं पुंडलिकनगरमध्ये जनसंपर्क कार्यालय आहे. नेहमी प्रमाणे सकाळी सावे हे कार्यालयात आले होते. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास गणेश शेजुळ नावाचा हा तरुण सावे यांच्या कार्यालयात आला. त्यांची भेट घेतली त्यानंतर बाहेर जाऊन त्याने कारवर दगड मारला.
या घटनेवर सावे यांनी स्पष्टीकरण दिलंय. 'मी माझ्या पुंडलिक नगर येथील कार्यालयात बसलेलो असताना नेहेमी येणारा मनोरुग्ण आला. नंतर त्याने बाहेर जाऊन माझ्या वाहनावर दगडफेक केली. मनोरुग्णच म्हणणं होत शिकलेलो असून नोकरी लागत नाही यातून त्याने दगडफेक केली आहे, असं मंत्री अतुल सावे याांनी सांगितलं. तसंच, याआधीही तो एक दोन वेळा आला होता. त्याला उपचारासाठी पैसे लागत होते, ते आम्ही दिलेही होते' असंही सावेंनी सांगितलं.
advertisement
अतुल सावेंनी नेहमी मदत केली'
'सदरील व्यक्ती ही मनोरुग्ण आहे. उपचारासाठी त्याने पैसे मागितले होते, अतुल सावे हे मदत करतही असतात. साहेबांनी एक महिन्यांच्या गोळ्या द्या, असं सांगितलं. तो ऑफिसच्या बाहेर गेला आणि त्याने गाडीवर दगड मारला. अतुल सावे यांनी पोलिसांकडे कोणतीही तक्रार वैगेरे केली नाही. पोलीस पुढे तपास करतील, अशी माहिती अतुल सावे यांचा पीए योगेश जाधव यांनी दिली.
advertisement
गुन्हा दाखल नाही, चौकशी सुरू
'अतुल सावे हे आपल्या जनसंपर्क कार्यालयात होते. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास, गणेश सखाराम शेजुळ हा सावे यांच्या कार्यालयात नेहमी येत जात होता. २०१० पासून त्याच्यावर मनोरुग्णाचे उपचार सुरू आहे. अतुल सावे यांच्याकडून वेळोवेळी मदतही झाली आहे. पण अचानक आज त्याने सावे यांच्या कारवर दगडफेक केली. अचानक त्याने येऊन दगडफेक केली नाही.  गाडीच्या काचेला तडा गेले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आम्ही अधिक तपास करत आहोत असं पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'शिकलेला असून नोकरी लागत नाही' मनोरुग्ण तरुणाकडून भाजप मंत्री अतुल सावेंच्या कार दगडफेक!
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement