'ना कळले कधी तुला...' मध्ये सुबोध-प्रार्थनाची जादुई केमिस्ट्री! ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’तील नवं गाणं व्हायरल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Better Half Chi Love Story : 'बेटर-हाफची लव्हस्टोरी' चित्रपटातील 'ना कळले कधी तुला' गाणं रिलीज झालं आहे. सुबोध भावे आणि प्रार्थना बेहरे यांच्या केमिस्ट्रीने या गाण्याला चार चाँद लावले आहेत.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे 'बेटर-हाफची लव्हस्टोरी'. या चित्रपटातील प्रत्येक झलक प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. नुकतंच या चित्रपटातील एक सुंदर प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे, ज्याचं नाव आहे 'ना कळले कधी तुला'. या गाण्यातून अभिनेते सुबोध भावे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्यात हळूवारपणे फुलणाऱ्या प्रेमाची भावना खूप सुंदर पद्धतीने दाखवण्यात आली आहे.
हर्षवर्धन वावरे आणि बेला शेंडे यांनी गायलेलं हे गाणं लगेचच मनात घर करतं. त्यांच्या गोड आणि भावस्पर्शी आवाजाने या गाण्याला एक वेगळीच जादू दिली आहे. संजय अमर आणि संजन पटेल यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत, तर संजन पटेल आणि अमेय नरे यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. गाण्याच्या प्रत्येक ओळीत प्रेमाची एक गोड अस्वस्थता आणि एका नव्या नात्याची सुंदर चाहूल जाणवते.
advertisement
या गाण्याबद्दल बोलताना दिग्दर्शक संजय अमर म्हणाले, "प्रेमाची भावना कधी कळते, तर कधी नकळत मनात येते. 'ना कळले कधी तुला' हे गाणं अशाच नकळत सुरू झालेल्या प्रेमाचं सुंदर रूप आहे. सुबोध आणि प्रार्थनाच्या डोळ्यातून हे प्रेम फुलताना पाहणं, हा प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव असेल."
advertisement
२२ ऑगस्टला चित्रपट होणार प्रदर्शित
'बेटर-हाफची लव्हस्टोरी' हा चित्रपट २२ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनीच केलं आहे. या चित्रपटात सुबोध भावे, प्रार्थना बेहरे यांच्यासोबतच अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात प्रेम आणि दुरावा यांचा उत्तम संगम पाहायला मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 06, 2025 6:39 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'ना कळले कधी तुला...' मध्ये सुबोध-प्रार्थनाची जादुई केमिस्ट्री! ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’तील नवं गाणं व्हायरल










