Prajakta Mali : भीमाशंकर-पुणे-महाराष्ट्र..., प्राजक्ता माळीने वाढदिवशीच पूर्ण केला 'तो' खास संकल्प!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Prajakta Mali Birthday : महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकताच तिचा ३६ वा वाढदिवस साजरा केला.
मुंबई : महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकताच तिचा ३६ वा वाढदिवस साजरा केला. 'फुलवंती' या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. प्राजक्ताला नुकतंच 'फुलवंती' चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'चा 'मराठी फिल्मफेअर अवॉर्ड' मिळाला आहे. अशातच हा वाढदिवस तिच्यासाठी आणखीनच खास ठरला आहे. अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर प्राजक्ताला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. पण, या वाढदिवसाचं खास वैशिष्ट्य म्हणजे, याच दिवशी प्राजक्ताने एक मोठा संकल्प पूर्ण केला, ज्यामुळे तिच्या आयुष्यातील एका मोठ्या अध्यायाचा समारोप झाला आहे.
भीमाशंकरच्या दर्शनाने झाली पूर्ण यात्रा!
गेल्या काही महिन्यांपासून प्राजक्ता माळीने १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाची यात्रा सुरू केली होती. आज वाढदिवसाच्या निमित्ताने तिने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्याजवळील भीमाशंकर देवस्थानाचं दर्शन घेतलं, आणि याच दर्शनासोबत तिची ही यात्रा पूर्ण झाली.
प्राजक्ताने तिच्या कुटुंबीयांसोबत भीमाशंकर मंदिरात जाऊन पूजा केली. या भेटीचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती शंकराच्या पिंडीवर तीर्थ अर्पण करताना आणि मनोभावे पूजा करताना दिसत आहे. तिच्यासोबत तिची आई, दोन भाचे आणि वहिनीही दिसत आहेत.
advertisement
advertisement
या फोटोंसोबत तिने एक भावूक पोस्ट लिहिली, "भीमाशंकर ज्योतिर्लिंग - पुणे - महाराष्ट्र. आणि अशाप्रकारे आज वाढदिवसाचं औचित्य साधून, भीमा नदीच्या काठी, निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या 'भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे' सहकुटुंब दर्शन घेऊन १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण केली."
काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत केदारनाथला जाऊन आली होती. तिथे दोघींनी एकत्र यात्रा पूर्ण केली होती. बद्रीनाथचंही दर्शन घेतलं होतं. आता भीमाशंकरच्या दर्शनानंतर तिच्या १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रवासाचा समारोप झाला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 08, 2025 6:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Prajakta Mali : भीमाशंकर-पुणे-महाराष्ट्र..., प्राजक्ता माळीने वाढदिवशीच पूर्ण केला 'तो' खास संकल्प!


