Nikki Tamboli : प्रणित मोरेला रंगावरून हिणवलं, निक्की तांबोळीचा चढला पारा, बसीर अलीला कडक शब्दात सुनावलं...
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Nikki Tamboli : बिग बॉस 19 च्या घरात सध्या खूप ड्रामा, भांडणे आणि सस्पेन्स सुरू आहे. कॅप्टन्सी टास्कपासून नॉमिनेशनपर्यंत अनेक मोठ्या घडामोडी सुरु आहेत.
मुंबई : बिग बॉस 19 च्या घरात सध्या खूप ड्रामा, भांडणे आणि सस्पेन्स सुरू आहे. कॅप्टन्सी टास्कपासून नॉमिनेशनपर्यंत अनेक मोठ्या घडामोडी सुरु आहेत. प्रणित मोरे आणि बसीर अली यांच्यात नुकतेच जोरदार भांडण झाले. या भांडणात दोघेही एकमेकांवर बरसले. बसीर आणि प्रणितच्या भांडणानंतर आता निक्की तांबोळीने पोस्ट शेअर केलीय. तिने प्रणितला सपोर्ट दाखवला.
निक्की तांबोळी पोस्ट
निक्की तांबोळीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रणित मोरेला सपोर्ट केला आहे. निक्कीने पहिल्यांदा बसीर अलीला झापलं. म्हणाली, "कोणाच्या कलरवरुन कमेंट करणं हे खूप लाजिरवाणं आहे. त्यानंतर तिने प्रणित मोरेला सपोर्ट करत म्हटलं, प्रणित सर्व महाराष्ट्राची लोक संपूर्ण देशातील लोकं तुझ्यासोबत आहेत. आपला मराठी माणूस आहे सर्वांनी सपोर्ट करा. तुझ्यावर अभिमान आहे."
advertisement
नेमकं प्रकरण काय?
या भांडणाची सुरुवात गायक अमाल मलिक याच्यामुळे झाली. अमाल हा प्रणितला त्याच्या पाठीमागे 'झझू' (Zazu) (द लायन किंग चित्रपटातील एक पात्र जो फक्त मेसेज देतो) या नावाने चिडवत होता. जेव्हा प्रणितला ही गोष्ट कळली, तेव्हा तो अमालवर भडकला. अमाल आणि प्रणित यांच्यात जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला. याच वादात बसीर अलीने उडी घेतली आणि भांडण अधिक वाढवले.
advertisement

nikki tamboli
advertisement
दरम्यान, या भांडणामुळे घरात काही वेळ वातावरण ताणलेले दिसले. काही सदस्य प्रणितच्या समर्थनार्थ उभे राहिले, तर काही बसीरच्या बाजूने होतील, अशी चर्चा रंगली. पण घरातील मॉनिटरिंग आणि नियमांचे पालन करणाऱ्या टीमने परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2025 5:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Nikki Tamboli : प्रणित मोरेला रंगावरून हिणवलं, निक्की तांबोळीचा चढला पारा, बसीर अलीला कडक शब्दात सुनावलं...