Bigg Boss 19: प्रणित मोरेचं जबरदस्त कमबॅक! मृदूलने आनंदात केलं असं काही... फरहानाच्या तोंडचं पाणी पळालं, VIDEO VIRAL

Last Updated:

Bigg Boss 19 Pranit More : कॅप्टन्सी टास्क जिंकल्यानंतर लगेचच डेंग्यूमुळे प्रणितला शो सोडावा लागला होता. आजच्या एपिसोडमध्ये प्रणित मोरेची धमाकेदार कमबॅक एन्ट्री पाहायला मिळणार आहे.

News18
News18
मुंबई : 'बिग बॉस १९' च्या घरात एक मोठा 'ट्विस्ट' आला आहे, कारण प्रकृतीच्या कारणास्तव घराबाहेर गेलेला कॉमेडियन प्रणित मोरे परतला आहे. कॅप्टन्सी टास्क जिंकल्यानंतर लगेचच डेंग्यूमुळे प्रणितला शो सोडावा लागला होता. त्याच्या जाण्याने स्पर्धक आणि चाहते दोघेही शॉक झाले होते, पण त्याची एन्ट्री मात्र अत्यंत हटके पद्धतीने झाली आहे. आजच्या एपिसोडमध्ये प्रणित मोरेची धमाकेदार कमबॅक एन्ट्री पाहायला मिळणार आहे.
नवीन प्रोमोमध्ये प्रणित मोरेची एन्ट्री स्टोर रूममधून होताना दाखवली आहे. स्टोर रूमची घंटी वाजताच नीलम गिरी स्टोर रूमध्ये आली. तिला तिथे कोणीतरी लपले असल्याचा संशय आला. तिने सगळ्यांना याची माहिती दिली. कोणालाही कळत नव्हतं, तिथे काय आहे. पण, अभिषेक बजाज आणि गौरव खन्ना यांनी लगेच अंदाज लावला की, प्रणितच परतला आहे.
advertisement
सर्वात आधी फरहाना भट्ट स्टोर रूमजवळ पोहोचली आणि प्रणितला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्णपणे बदलले. तिच्या आणि कुनिकाच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. याउलट, मृदुलने धावत जाऊन प्रणितला घट्ट मिठी मारली आणि 'प्रणित' असे ओरडत आनंद व्यक्त केला. त्याच्या इतर मित्रांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता.
advertisement
advertisement

पुन्हा रंगणार 'द प्रणित मोरे शो'

घरात परतल्यानंतर प्रणित मोरेचा रोस्टिंग कार्यक्रमही पुन्हा सुरू होणार आहे. प्रणित मोरे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात 'द प्रणित मोरे शो' करणार आहे. तो नेहमीप्रमाणेच आपल्या खास शैलीत घरातील सदस्यांना रोस्ट करणार आहे, ज्यामुळे घरात आता मनोरंजनाचा तडका पुन्हा सुरू होईल.

प्रणितला मिळाली खास पॉवर

advertisement
रिपोर्ट्सनुसार, बिग बॉसने प्रणित मोरेला त्याच्या कमबॅकवर एक अत्यंत महत्त्वाची पॉवर दिली आहे. या पॉवरमुळे प्रणित मोरे या आठवड्यातील एका नॉमिनेटेड स्पर्धकाला घराबाहेर जाण्यापासून वाचवू शकतो. या आठवड्यात गौरव खन्ना, नीलम गिरी, फरहाना भट्ट, अशनूर कौर आणि अभिषेक बजाज हे स्पर्धक नॉमिनेटेड असून त्यांच्यापैकी एक स्पर्धक घराबाहेर जाण्याची शक्यता आहे. चाहते अंदाज लावत आहेत की, प्रणित मोरे त्याच्या मित्रांपैकी गौरव खन्ना किंवा अशनूर कौर यांपैकी एकाला वाचवू शकतो. जर असे झाले, तर या आठवड्याचा खेळ पूर्णपणे पलटणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 19: प्रणित मोरेचं जबरदस्त कमबॅक! मृदूलने आनंदात केलं असं काही... फरहानाच्या तोंडचं पाणी पळालं, VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement