BBM 6 : आठवडाभर आराम, 'सरकार' पुन्हा पेटलं! 17 जणांच्या विरोधात जाणार दिव्या शिंदे, पण का?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 च्या घरात कॅप्टन्सीवरून पुन्हा एकदा वाद पाहायला मिळणाारआहे. दिव्या VS संपूर्ण घर असा सामना पाहायला मिळणार आहे.
बिग बॉस मराठीच्या घरातील दुसरा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात देखील तितकीच धम्मल मस्ती, भांडणं आणि राडे पाहायला मिळणार आहेत. घरात खेळ आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. घरात प्रत्येक सदस्य स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी धडपडत असतानाच पुन्हा एकदा'कॅप्टन्सी' वरून घरात राडा होणार आहे. समोर आलेल्या प्रोमोवरून यामध्ये दिव्या कॅप्टन्सी क्षमतेवर इतर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
गेल्या आठवडावर दिव्या घरात फारशी दिसली नव्हती. तिची तब्येत ठीक नसल्याने खूप शांत होती. तिने मिशन राशन हा टास्क चांगला खेळला मात्र त्यानंतर ती आजारी पडली. ती घरातही फार कोणाशी बोलताना दिसली नाही. पण आता दुसऱ्या आठवड्यात मात्र दिव्या बरी झाली असून सगळ्यांना नडायला तयार झाली आहे.
( 'पुन्हा हे बोलण्याची हिंमत करू नको', अनुश्री माने असं काय बोलली, ज्यामुळे इतका संतापला राकेश बापट )
advertisement
प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, घरातील सदस्य कॅप्टन्सीच्या मुद्द्यावर एकत्र बसले आहेत. यावेळी काही सदस्यांनी दिव्यावर थेट निशाणा साधला आहे. अनुश्री म्हणते, "दिव्या कॅप्टन्सीसाठी पात्र नाही," तर दुसरीकडे रुचिताने मत मांडले की, "कॅप्टन असा असावा ज्याने दोन्ही बाजूंचे म्हणणे नीट ऐकून घेतले पाहिजे. त्यात सचिन आणि सागर यांनी म्हटलं, "दिव्या mature नाहीये अजून, अनुभवाच्या जोरावर दिव्या इतरांपेक्षा थोडी कमी पडते." त्यावर
advertisement
"अनुभव जन्मत: नसतो"असं रोखठोक उत्तर दिव्या देते.
advertisement
घरातील सदस्यांनी लावलेल्या आरोपांनंतर दिव्या शांत बसलेली नाही. तिने आपली बाजू मांडली. दिव्या म्हणाली, "अनुभव जन्मतः कोणालाच नसतो. जर तुम्ही असं म्हणत असाल, तर मी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात उभी राहते!" दिव्याचा हा करारी बाणा पाहून आता घरातील समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
आता दिव्या तिचे मुद्दे घरच्यांना पटवून देऊ शकेल का? की तिला या कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागेल? कोण बनणार घराचा कॅप्टन ? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 2:32 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
BBM 6 : आठवडाभर आराम, 'सरकार' पुन्हा पेटलं! 17 जणांच्या विरोधात जाणार दिव्या शिंदे, पण का?









