जय खान्देश! 'केसावर फुगे' फेम सचिन कुमावतची Bigg Boss Marathi 6 मध्ये एन्ट्री! घरात घेऊन गेले खास वस्तू

Last Updated:

खान्देशचा आवाज सचिन कुमावत यांनी बिग बॉस मराठी 6 मध्ये एन्ट्री घेत सगळ्यांची उत्सुकता वाढवली आहे. 

News18
News18
Bigg Boss Marathi 6 मध्ये तिसऱ्या स्पर्धकाची जोरदार एन्ट्री झाली.  खानदेशचा किंग सचिन कुमावत यांनी घरात एन्ट्री घेतली आहे. केसावर फुगे, सावन महिना सारखी दमदार अहिरणी गाणी करणारा खान्देशचा आवाज सचिन कुमावत यांनी बिग बॉस मराठी 6 मध्ये एन्ट्री घेत सगळ्यांची उत्सुकता वाढवली आहे.  आपल्या अनोख्या शैलीमुळे आणि अहिराणी भाषेतील म्युझिक व्हिडीओमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेल्या सचिन कुमावक यांची बिग बॉसच्या घरातील एन्ट्री विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.
घरात प्रवेश करताना सचिन कुमावतने आपली ओळख करून दिली. "माझ्या अहिराणी मायबोलीला जगभरात पोहोचवणार आहे. 14 कोटी व्ह्यूजना 14 हजार कोटी व्ह्यूवर घेऊन जायचं स्वप्न आहे", अशी महत्त्वाकांक्षा घेऊन सचिन कुमावत यांनी घरात एन्ट्री केली आहे.  खानदेशी संस्कृती, भाषा आणि माणुसकी संपूर्ण महाराष्ट्रासह जगासमोर मांडण्याचा निर्धार त्याच्या बोलण्यातून दिसून आला.
advertisement
सचिन कुमावत  खान्देशच्या मातीतून, कष्टातून उभा राहिलेला कलाकार आहे. याच मेहनतीवर विश्वास ठेवत त्यांनी घरात एन्ट्री घेतली आहे. "मेहनत करून आलोय आणि मेहनत करूनच जाईन",  असं ठामपणे म्हणत त्यानी मेहनतीचं दार निवडलं. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात जाताना त्यांना हातात पिठाचा डब्बा घेऊन आत पाठवलं.



 










View this post on Instagram























 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)



advertisement
सामान्य कुटुंबातून आलेला, मेहनतीच्या जोरावर नाव कमावलेला सचिन बिग बॉसच्या घरात काय रंगत आणणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जय खान्देश! अशा घोषणेसह सचिन कुमावत यांनी बिग बॉसमध्ये केलेल्या एन्ट्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. केलेली ही एन्ट्री बिग बॉस मराठी 6 मध्ये नवा रंग भरणारी ठरेल, यात शंका नाही. त्याची स्पष्ट भूमिका, आत्मविश्वास आणि अहिराणी अस्मिता पुढील दिवसांत घरात कसं वातावरण निर्माण करणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
जय खान्देश! 'केसावर फुगे' फेम सचिन कुमावतची Bigg Boss Marathi 6 मध्ये एन्ट्री! घरात घेऊन गेले खास वस्तू
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement