advertisement

"माझं ऑपरेशन झालं..."; बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने दिली हेल्थ अपडेट, ऑपरेशन थिएटरमधून PHOTO केले शेअर

Last Updated:

bodybuilder sangram chougule health update : बिग बॉसच्या घरात अपघात झालेल्या बॉडीबिल्डर संग्रामच्या हाताची आताची सर्जरी झाली आहे. सर्जरीनंतर हाताची सध्याची परिस्थिती काय आहे हे दाखवणारे फोटो त्याने शेअर केलेत.

संग्राम चौगुले
संग्राम चौगुले
मुंबई : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड संग्राम चौगुलेचा घरात टास्क दरम्यान अपघात झाला. त्याच्या डाव्या हाताच्या मनगटाला मोठी दुखापत झाली. ज्यामुळे त्याला घराबाहेर पडावं लागलं. घराबाहेर आल्यानंतर संग्रामला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याच्या हाताची सर्जरी करण्यात आली. 23 सप्टेंबरला संग्रामच्या हाताची सर्जरी नीट पार पडली आहे. संग्रामने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. संग्रामच्या हाताची आताची अवस्था देखील त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय.
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर पाच दिवस संग्राम मुंबईच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये होता. तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या हाताच्या मनगटाची सर्जरी करण्यात आली. संग्रामने ऑपरेशन थिएटरमधील व्हिडिओ शेअर केला आहे. संग्रामबरोबर हॉस्पिटलमध्ये त्याची संपूर्ण फॅमिली होती.
advertisement
संग्रामने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाताना दिसत आहे. स्पेशल डॉक्टरांच्या टीमकडून त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. सर्जरीनंतरचे फोटो संग्रामने शेअर केलेत. ज्यात त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर टाके पडलेले आहेत. हात पूर्ण सुजला आहे.
संग्रामने फोटो शेअर करत पोस्ट देखील लिहिली आहे. त्यानं म्हटलंय, "नमस्कार मंडळी. जसं तुम्हाला माहिती होतं की माझं ऑपरेशन होतं, ते नीट पार पडलं आहे!" याचबरोबर त्याने ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे देखील आभार मानले आहेत.
advertisement
advertisement
संग्रामच्या सर्जरीनंतर त्याच्या चाहत्यांच्या जीवात जीव आला आहे. चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. एका चाहत्यानं लिहिलंय, "माझा विश्वास नव्हता, थोडंफार स्क्रिप्टेड वाटत होतं पण फोटोज पाहून विश्वास बसला, काळजी घ्या दादा". दुसऱ्या युझरनं लिहिलंय, "तुम्ही लवकर बरे व्हा, देवाकडे हेच मागणे"
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
"माझं ऑपरेशन झालं..."; बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने दिली हेल्थ अपडेट, ऑपरेशन थिएटरमधून PHOTO केले शेअर
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement