Farhan Akhtar Mother News: फरहान अख्तरच्या आईला लाखो रूपयांचा गंडा, कशी झाली फसवणूक ?

Last Updated:

Farhan Akhtar's Mother's Driver Accused Of Fuel Card Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि सिनेनिर्माता फरहान अख्तर यांची आई हनी इराणी यांची अलिकडेच लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. या घटनेने अख्तर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

News18
News18
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि सिनेनिर्माता फरहान अख्तर यांची आई हनी इराणी यांची अलिकडेच 12 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या घटनेने अख्तर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कारण हनी इराणी यांची कोणत्या बाहेरील व्यक्तीने फसवणूक केली नसून त्यांचा कार ड्रायव्हर नरेश सिंगने केली आहे, त्याच्यासोबत पेट्रोल पंपवरील एक कर्मचारी देखील होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "हनी इराणी यांची मॅनेजर दिया भाटिया हिने 1 ऑक्टोबर रोजी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की, ड्रायव्हर नरेश सिंग गेल्या अनेक दिवसांपासून फरहान अख्तर यांच्या नावावर असलेल्या क्रेडिट कार्डाचा गैरवापर करत होता. नरेश सिंगला ते क्रेडिट कार्ड पेट्रोल भरण्यासाठी देण्यात आले होते, परंतु नरेशने ते फसवणुकीसाठी वापरले." तपासादरम्यान, हनी इराणी यांच्या टीमला काही पेट्रोल बिलांमध्ये तफावत आढळून आल्याने त्यांना संशय आला. मीडिया रिपोर्टनुसार, ड्रायव्हरने ज्या कारमध्ये पेट्रोल भरले त्याची क्षमता 35 लीटर इतकी होती, परंतु बिलामध्ये 62 लीटरचे पैसे घेतल्याचे दाखवण्यात आले होते. इतकंच नाही तर, हनी इराणी यांच्या कुटुंबियांनी सात वर्षांपूर्वी विकलेल्या वाहनामध्येही पेट्रोल भरल्याच्या नोंदी दिसत होत्या.
advertisement
जेव्हा मॅनेजर दिया भाटिया यांनी ड्रायव्हर नरेशला काही प्रश्न विचारले असता तेव्हा ड्रायव्हरने दिया भाटिया यांना पटतील असे उत्तरं देऊ शकला नाही. त्यानंतर सखोल चौकशी करण्यात आली, ज्यामध्ये नरेश सिंगने फरहान अख्तरच्या नावावरील असलेल्या तीन वेगवेगळ्या कार्डांचा गैरवापर केल्याचे उघड झाले. पोलिस तपासात असे दिसून आले की ड्रायव्हर नरेश नेहमीच वांद्रे तलाव जवळील एसव्ही रोडवरील पेट्रोल पंपावर नियमितपणे त्याचे कार्ड स्वाइप करत असे. तेथील कर्मचारी अरुण सिंग ड्रायव्हर नरेशकडून अनेकदा पेट्रोल न देता पैसे घेत असे. दोघेही त्यांच्यात पैसे वाटून घेत असत- प्रत्येक व्यवहारातून नरेशला अंदाजे 1000 ते 1500 रूपये मिळत असत.
advertisement
दरम्यान, नरेशने पोलि‍सांसमोर कबूल केले की त्याने 2022 मध्ये फरहान अख्तरच्या एका जुन्या ड्रायव्हरकडून हे कार्ड मिळवले होते आणि तेव्हापासून तो ही फसवणूक करत होता. मुंबई पोलि‍सांनी या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४), आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या फसवणुकीत ड्रायव्हर नरेश सिंग आणि पेट्रोल पंप कर्मचारी अरुण सिंग या दोघांवर गुन्हा दाखल केले आहेत. अद्याप, फरहान अख्तर किंवा झोया अख्तर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. शिवाय, आतापर्यंत फरहान अख्तर किंवा त्याच्या अन्य कुटुंबीयांकडूनही या प्रकरणावर कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फरहानची टीम या प्रकरणात कायदेशीर कारवाईसाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहे आणि तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Farhan Akhtar Mother News: फरहान अख्तरच्या आईला लाखो रूपयांचा गंडा, कशी झाली फसवणूक ?
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement