Ind vs Aus: स्पायडरमॅनशिवाय टीम इंडियाला खेळावा लागणार सामना, BCCI कडून हेल्थबाबत आली अपडेट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऋषभ पंत दुखापतीमुळे टीम इंडियाबाहेर राहणार आहे. BCCI ने त्याला विश्रांती दिली असून चाहत्यांना त्याची कमतरता जाणवणार आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. स्पायडरमॅनशिवाय टीमला खेळावं लागणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू त्याला खूप मिस करणार आहेत. त्याची प्रकृती अजूनही पाहिजे तेवढी सुधारली नसल्याने त्याला आराम देण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांचीही थोडी नाराजी आहे. मात्र चाहते तो लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत.
advertisement
टीम इंडिया धडाकेबाज विकेटकीपर आणि बॅट्समन ऋषभ पंत आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून बाहेर राहणार आहे. भारत ऑस्ट्रेलियामध्ये 3 वन डे आणि 5 टी 20 सामन्यांची सीरिज खेळणार आहे. या सीरिजमधील पहिला वनडे सामना 19 ऑक्टोबरला पर्थमध्ये खेळला जाईल. मिडल ऑर्डरमध्ये पंतसारख्या आक्रमक खेळाडूच्या अनुपस्थितीमुळे, टीम इंडियाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पंतचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याचे संभाव्य वेळापत्रक आता १४ नोव्हेंबर पासून कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणारी पहिली कसोटी असू शकते. टी२० आशिया चषकात मधल्या फळीत त्याच्यासारख्या प्रभावी फलंदाजाची कमतरता भारताला जाणवली होती, तरीही संजू सॅमसनने त्या वेळी चांगली कामगिरी केली होती.
advertisement