कॉर्डिलिया क्रुझवर नशेत आढळलेले न्यायाधीश अखेर सेवेतून बडतर्फ, साताऱ्याच्या लाचखोर न्यायाधीशांवरही कारवाईचा बडगा

Last Updated:

आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रुझवर एका न्याय दंडाधिकाऱ्यालाही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं

News18
News18
मुंबई : राज्यातील दोन सत्र न्यायाधीशांना हायकोर्टानं बडतर्फ केलंय. सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांना लाचखोरीच्या आरोपात तर सध्या पालघर जिल्हा सत्र न्यायालयात सेवेत असलेल्या इरफान शेख यांच्यावर अंमली पदार्थांचं सेवन आणि तस्करी केल्याच्या आरोपांखाली ही कारवाई करण्यात आलीय.
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांनी जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी आधी सत्र न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, दोन्ही न्यायालयांनी त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. तथापि, त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले नव्हते. याप्रकरणी त्यांची उच्च न्यायालय प्रशासनाच्या शिस्तपालन समितीकडून चौकशी होऊन अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अहवालाच्या आधारे त्यांच्या बडतर्फीचा आदेश काढण्यात आला.
advertisement

कॉर्डिलिया क्रुझवर नशेत आढळले होते इरफान शेख

आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रुझवर एका न्याय दंडाधिकाऱ्यालाही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं.  मात्र त्याला गुप्तपणे बाहेर काढण्यात आल्याचा दावा करत आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केलीय, जी अद्याप न्यायप्रविष्ट आहे. हे दंडाधिकारी महाशय क्रुझवर नशेत इतके चूर होते की, त्यांना थेट रुग्णालयात नेण्यात आल्याचा दावाही याचिकेतून करण्यात आलाय. इतकंच नव्हे तर अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी इरफान शेख हे बलार्ड पीअर येथील NDPS कोर्टात कार्यरत असताना त्यांच्या कोर्टात एनसीबीनं जप्त केलेला मुद्देमाल जो पुरावा म्हणून ठेवण्यात येतो, त्या अंमली पदार्थांवर थेट डल्ला मारून त्याचं स्वत:ही सेवन करीत तसेच ते बॉलिवूडमधील आपल्या काही मित्रांमध्येही वाटत असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आलाय.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कॉर्डिलिया क्रुझवर नशेत आढळलेले न्यायाधीश अखेर सेवेतून बडतर्फ, साताऱ्याच्या लाचखोर न्यायाधीशांवरही कारवाईचा बडगा
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement