अबब..! साउथ सुपरस्टार कमल हसन यांच्याकडे गाड्यांचं भन्नाट कलेक्शन, एकूण संपत्ती किती? आकडा पाहून व्हाल शॉक
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Actor Kamal Hasan Networth : साउथचे सुपरस्टार अभिनेते कमल हसन यांची कोट्यावधीची आहे संपत्ती. महाग गाड्यांचे कलेक्शन आहे. पण नेमकी किती संपत्ती आहे?
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज अभिनेते त्यांच्या लक्झरी लाइफ स्टाईलसाठी जगप्रसिद्ध आहेत. साउथ चित्रपटसृष्टीने चित्रपटाची कथा, मूळ संस्कृती जपत कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळे तिकडचे कलाकार कायम वेगवेगळ्या गोष्टींबाबत चर्चेत येत असतात. साउथचे सुपरस्टार अभिनेते कमल हसन यांची काही वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.
सुपरस्टार अभिनेते कमल हसन हे खूपच टॅलेंटेड आणि हुशार अभिनेते समजले जातात. त्याप्रमाणेच त्यांची लक्झरी लाइफ चर्चेत असते. अभिनेते कमल हसन यांचा जन्म एका तमिळ अयंगार ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात ही बालकलाकार म्हणून केली होती. तो चित्रपट होता कलथूर कनम्मा जो 1960 मध्ये आला होता. त्यानंतर अभिनेते कमल हसन इंडस्ट्रीमध्ये काम करत राहिले. त्यांनी आपले इंडस्ट्रीत खूप नाव कमावले. आपल्या अभिनयाच्या जोरावर तगडी नेटवर्थ तयार केली. त्यांची संपत्ती ऐकून नक्कीच आपल्याला आश्चर्य वाटेल.
advertisement
अभिनेते कमल हसन यांची लक्झरी लाइफ
CNBC-TV18 यांच्या एका रिपोर्टनुसार, कमल हसन यांची संपत्ती 450 कोटी एवढी आहे. त्यांनी ही सर्व संपत्ती आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मिळवली आहे. त्यांचा दुसरा महत्त्वाचा आर्थिक स्त्रोत म्हणजे त्यांचे स्वतःचे प्रोडक्शन हाउस आहे, जे 'राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल' या नावाने चालवले जाते. कमल ब्रँड आणि टीव्ही वेंचर्समधून ते मोठी कमाई करतात. एका प्रोजेक्टचे 100 कोटी रुपये ते चार्ज करतात. त्यांनी इंडियन 2 चित्रपटासाठी 150 कोटी रुपये घेतले होते.
advertisement
कमल हसन यांचा चेन्नईमध्ये 60 वर्ष जुना एक वडिलोपार्जित बंगला असून तो 92 कोटी रुपये एवढ्या किमतीचा आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे एक अपार्टमेंटही आहे, त्याचीही किंमत कोट्यावधीमध्ये आहे. तसेच गाड्यांच्या कलेक्शनमध्ये त्यांच्याकडे BMW 730LD आणि लेक्सस एलएक्स 570 सारख्या महागड्या गाड्या आहेत.
अभिनेते कमल हसन यांचे चित्रपट
view commentsअभिनेते कमल हसन शेवटचे 'ठग लाइफ' चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट हल्लीच 2025 मध्ये रिलीज झाला होता. याअगोदर त्यांनी इंडियन 2, कल्कि 2898एडी, विक्रम, विश्वरूपम या चित्रपटात काम केले होते. आता त्यांच्या हातात सध्या दोन मोठे चित्रपट आहेत. इंडियन 3 या चित्रपटाचे काम खूप धीम्या गतीने चालू आहे. तर कल्कि 2898एडी पार्ट 2 मध्येही ते दिसणार आहेत, ज्यात ते सुप्रीम यस्कीनच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या चाहत्यांना या चित्रपटाची खूपच उत्सुकता लागली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2025 4:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अबब..! साउथ सुपरस्टार कमल हसन यांच्याकडे गाड्यांचं भन्नाट कलेक्शन, एकूण संपत्ती किती? आकडा पाहून व्हाल शॉक


