शॉकिंग! अक्षय कुमारच्या हिरोईनला झालं तरी काय? हॉस्पिटलमधून शेअर केला PHOTO, म्हणते 'लवकरच मी...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Chitrangada Singh Hospitalized : बॉलिवूडची सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई : बॉलिवूडची सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिने स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिल्याने तिचे चाहते सध्या खूप काळजीमध्ये आहेत आणि ती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.
इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला फोटो
चित्रांगदा सिंगने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रुग्णालयातील बेडवरून एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती बेडवर झोपलेली दिसत असून तिच्या हाताला सलाईन लावलेली आहे. हा फोटो शेअर करताना चित्रांगदाने एक छोटा पण सकारात्मक मेसेज लिहिला आहे. तिने म्हटले आहे, "लवकरच सशासारखी धावू शकेन!"
चित्रांगदाने तिला नेमका कोणता त्रास झाला आहे किंवा तिला रुग्णालयात दाखल करण्याचे कारण काय आहे, हे स्पष्टपणे सांगितले नाही. मात्र, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर तिचे चाहते तिला 'गेट वेल सून' म्हणत आहेत.
advertisement
'हाऊसफुल ५' मध्ये व्हिलनची भूमिका गाजवली!
चित्रांगदा सिंगच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती नुकतीच 'हाऊसफुल ५' या सुपरहिट चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे ती खूप चर्चेत आली होती. विशेष म्हणजे, या कॉमेडी फ्रेंचायझीमध्ये तिने व्हिलनची भूमिका साकारली होती आणि तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. हा 'हाऊसफुल' मालिकेतील पाचवा चित्रपट होता, जो दोन भागांमध्ये प्रदर्शित झाला आणि दोघांचा क्लाइमॅक्स वेगवेगळा होता.
advertisement
advertisement
लवकरच सलमान खानसोबत दिसणार
चित्रांगदा सिंग लवकरच सुपरस्टार सलमान खानसोबत 'बॅटल ऑफ गलवान' या महत्त्वाकांक्षी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट वास्तविक घटनांवर आधारित असून, त्यात भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाची कहाणी दाखवली जाण्याची शक्यता आहे. या चित्रपटासाठीही तिचे चाहते उत्सुक आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 7:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
शॉकिंग! अक्षय कुमारच्या हिरोईनला झालं तरी काय? हॉस्पिटलमधून शेअर केला PHOTO, म्हणते 'लवकरच मी...'