advertisement

"मला मारून टाकतील", खामेनेईंच्या मृत्यूनंतर घाबरली बॉलीवूड अभिनेत्री, नेमकं काय म्हणाली?

Last Updated:

"सेक्रेड गेम्स" या वेब सिरीजमधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री एलनाज नोरोझी सध्या तिच्या विधानांमुळे चर्चेत आहे.

News18
News18
दिल्ली: "सेक्रेड गेम्स" या वेब सिरीजमधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री एलनाज नोरोझी सध्या तिच्या विधानांमुळे चर्चेत आहे. तिने अलिकडेच इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त केला. मूळची इराणी वंशाच्या असलेल्या एलनाजने म्हटलं की ती तिच्या मायदेशी, इराणमध्ये परतू शकत नाही. कारण ती तिथे गेली तर तिला मारुन टाकलं जाईल, अशी भीती तिला आहे.
बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, एलनाजने स्पष्ट केलं की तिचा निषेध इराणच्या लोकांविरुद्ध नाही तर तिथल्या इस्लामिक रिपब्लिक राजवटीविरोधात आहे. ती म्हणाली, "जेव्हा आपण इराणबद्दल बोलतो तेव्हा मी इस्लामिक रिपब्लिक आणि इराणच्या लोकांमध्ये फरक करू इच्छिते. इस्लामिक रिपब्लिकने देशावर कब्जा केला आहे. बहुतेक इराणी लोक हुशार आणि सुशिक्षित आहेत आणि त्यांचे विश्वास इस्लामिक रिपब्लिकच्या श्रद्धांपेक्षा वेगळा आहे." एकेकाळी इराणचे इस्रायल आणि अमेरिकेशी चांगले संबंध होते, असंही तिने सांगितलं.
advertisement

एलनाज नोरोझी कोण आहे?

इराणमध्ये जन्मलेली एलनाज वयाच्या ८ व्या वर्षी तिच्या कुटुंबासह जर्मनीला गेली. वयाच्या २० व्या वर्षी ती भारतात आली आणि चित्रपटसृष्टीचा भाग बनली. तिने स्पष्ट केलं की ती गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून इराणला गेली नाही. आता ती परत जाऊ शकत नाही. ती म्हणाली की, मी इराणमध्ये पाऊल ठेवू शकत नाही. जर मी असं केलं तर मला भीती वाटते की ते मला मारून टाकतील. २०२२ च्या निदर्शनांदरम्यान झालेल्या घटनेमुळे मी इराणला जाऊ शकली नाही, जेव्हा त्यांनी महसा अमिनीची हत्या केली." तिने स्पष्ट केले की ती दशकांपासून इराणी राजवटीच्या धोरणांमुळे होणाऱ्या दडपशाहीविरुद्ध निषेध करत होती आणि तिचे विधान केवळ राजवटीविरुद्ध असहमती व्यक्त करण्यासाठी होते, लोकांच्या संस्कृती किंवा देशाविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी नव्हते.
advertisement

एलनाजची चित्रपट कारकीर्द

एलनाजने २०१७ मध्ये एका पाकिस्तानी चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१८-१९ मध्ये तिने "सेक्रेड गेम्स" च्या दोन सीझनमध्ये झोयाची भूमिका केली होती, ज्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ती "अभय", "मेड इन हेवन", "जुग जुग जीयो" आणि "मस्तीज ४" सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. २०२३ मध्ये तिने जेरार्ड बटलरसोबत "कंदहार" या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
"मला मारून टाकतील", खामेनेईंच्या मृत्यूनंतर घाबरली बॉलीवूड अभिनेत्री, नेमकं काय म्हणाली?
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement