'मला एकटं सोडा...', आमिरच्या गर्लफ्रेंडने भर रस्त्यातच पॅप्सना सुनावलं, VIDEO तुफान व्हायरल

Last Updated:

Aamir Khan GF Gauri Spratt : आमिर खानच्या गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटचा फोटोग्राफर्सवर संतापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण नेमकं काय घडलं?

News18
News18
मुंबई : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान त्याच्या कामापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी त्याने त्याच्या ६० व्या वाढदिवशी गौरी स्प्रॅट ही त्याची नवीन गर्लफ्रेंड असल्याचं जाहीर केलं. आता गौरी तिच्या रागामुळे चर्चेत आली आहे. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात ती फोटोग्राफर्सवर संतापताना दिसत आहे.

फोटोग्राफर्सवर भडकली गौरी

गौरी स्प्रॅट बांद्रा परिसरात चालायला गेली होती. त्याचवेळी काही फोटोग्राफर्सनी तिचा पाठलाग सुरू केला. गौरी त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होती, पण ते काही थांबले नाहीत. जेव्हा फोटोग्राफर्सनी तिला फोटो काढण्यासाठी पोझ द्यायला सांगितली, तेव्हा तिचा राग अनावर झाला.
गौरी खूप चिडून म्हणाली, “अरे, मला एकटीला सोडा! मी फक्त चालायला जात आहे.” असं बोलून ती तिथून पुढे निघून गेली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. काही लोक तिला ट्रोल करत आहेत, तर काही जण तिला सपोर्ट करत आहेत.
advertisement
advertisement

आमिर-गौरीची लव्ह स्टोरी!

आमिर खानने त्याच्या ६० व्या वाढदिवशी सगळ्यांना गौरीबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला होता की, गौरीला तो २५ वर्षांपासून ओळखतो, पण गेल्या काही महिन्यांपासून ते दोघे एकत्र आहेत. आमिर म्हणाला होता की, त्याला अशा एका व्यक्तीची गरज होती, जी त्याला शांतता देऊ शकेल.
अलीकडेच आमिर खानला एका पॉडकास्टमध्ये विचारण्यात आलं होतं की, तो एखाद्या व्यक्तीशी काही महिन्यातच लग्न करू शकतो का? यावर तो म्हणाला की, आता असं शक्य नाही, कारण त्याला त्या व्यक्तीसोबत पूर्ण आयुष्य घालवायचं आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मला एकटं सोडा...', आमिरच्या गर्लफ्रेंडने भर रस्त्यातच पॅप्सना सुनावलं, VIDEO तुफान व्हायरल
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement