Parineeti Chopra Baby : परिणीती चोप्राने दिली गुड न्यूज! चिमुकल्याच्या आगमनाने राघव चड्ढा भावूक, म्हणाले 'पूर्वीचे आयुष्य...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Parineeti Chopra baby : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या घरी लहानग्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. राघवने सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर केली असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नवी दिल्ली : बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि 'आम आदमी पार्टी'चे नेते राघव चढ्ढा यांच्या घरी अखेर चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे! गेल्या अनेक महिन्यांपासून परिणीतीच्या प्रेग्नेंसीमुळे दोघांवर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत होता. आता बाळाच्या आगमनाची बातमी राघव चढ्ढा यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून सर्वांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
परिणीती-राघव यांच्या आयुष्याच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन
मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती चोप्रा यांना डिलिव्हरीसाठी दिल्लीतील एका नामांकित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पती राघव चढ्ढा हे सुरुवातीपासूनच पत्नीसोबत रुग्णालयात उपस्थित होते. काही वेळापूर्वीच राघव यांनी सोशल मीडियावर एक गोड पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. परिणीतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे!
advertisement
बाबा बनल्यावर राघव चढ्ढा झाले भावूक
वडिल होण्याची भावना व्यक्त करताना राघव चढ्ढा यांनी शेअर केलेला फोटो आणि कॅप्शन खूपच हृदयस्पर्शी आहे. त्यांनी लिहिले, "अखेर तो आला! आमचा लहानगा मुलगा. आणि आम्हाला खरोखरच पूर्वीचे आयुष्य आठवत नाही! आधी आम्ही फक्त एकमेकांसाठी होतो, आता आमच्याकडे सर्वकाही आहे! परिणीती आणि राघव."
advertisement
advertisement
राघव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना 'पूर्वीचे आयुष्य आठवत नाही' असे सांगून बाळाच्या आगमनानंतरचे त्यांचे नवीन विश्व किती सुंदर आहे, हे सांगितले. त्यांच्या या पोस्टवर आता त्यांचे चाहते, राजकीय नेते आणि बॉलिवूडमधील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.
परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्यासाठी हा क्षण खूप खास आहे. लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांनी बाळाच्या जन्माची गोड बातमी देऊन चाहत्यांना आनंदाचा डबल डोस दिला आहे. या दोघांच्याही आयुष्याचा हा एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचा अध्याय सुरू झाला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2025 4:49 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Parineeti Chopra Baby : परिणीती चोप्राने दिली गुड न्यूज! चिमुकल्याच्या आगमनाने राघव चड्ढा भावूक, म्हणाले 'पूर्वीचे आयुष्य...'