जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट; अखेर 30 वर्षांनी पूर्ण झालं शाहरुख खानचं स्वप्न, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव, VIDEO

Last Updated:

Shah Rukh Khan Won National Award : शाहरुख खानला २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ या चित्रपटातील अभिनयासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

News18
News18
मुंबई : बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खान गेल्या ३० वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याने अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत, पण त्याला कधीच ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला नव्हता. अखेर, हे स्वप्न आता पूर्ण झालं आहे. त्याच्या २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

दिल्लीत झाला गौरव!

‘जवान’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, विजय सेतुपती आणि नयनतारा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले. या चित्रपटातील शाहरुखचा अभिनय सगळ्यांना खूप आवडला होता.
आज, २३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील एका भव्य सोहळ्यात त्याला हा पुरस्कार देण्यात आला. शाहरुख काळ्या रंगाच्या ‘बंधगला’ ड्रेसमध्ये खूपच हँडसम दिसत होता. जेव्हा त्याला पुरस्कार मिळाला, तेव्हा तो क्षण त्याच्या करिअरमधील एक ऐतिहासिक क्षण बनला. पुरस्कारासाठी शाहरुखचे नाव घोषित होताच सभागृहात एकच जल्लोष सुरू झाला. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने टाळ्यांच्या कडकडाटात शाहरुख खानचे अभिनंदन केले. त्याच्यासाठी हा क्षण खूपच हृदयस्पर्शी ठरला.
advertisement

शाहरुख खानचे आगामी चित्रपट कोणते?

शाहरुख खानने नुकताच त्याच्या मुलाच्या, आर्यन खानच्या पहिल्या सिरीजमध्ये खास भूमिका केली. आता तो त्याच्या पुढील चित्रपटासाठी तयारी करत आहे. त्याच्या पुढील चित्रपटाचं नाव ‘किंग’ आहे, ज्याचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना खानही पहिल्यांदाच त्याच्यासोबत दिसणार आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होईल.
मराठी बातम्या/मनोरंजन/
जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट; अखेर 30 वर्षांनी पूर्ण झालं शाहरुख खानचं स्वप्न, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव, VIDEO
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement