पुन्हा एकदा ट्रॉफी महाराष्ट्रात आणणार, इंडियन आयडॉलच्या स्टेजवर चैतन्य, पाहा खास मुलाखत

Last Updated:

अठरा वर्षाचा चैतन्य हा पुण्याच्या आळंदी या गावातील आहे. लहानपणापासूनच संगीताचे शिक्षण घेऊन सतत रियाज करत चैतन्य आयडॉल 15 च्या स्टेजवर पोहोचला आहे.

+
इंडियन

इंडियन आयडल मध्ये महाराष्ट्रचा ठसा

निकिता तिवारी, प्रतिनिधी 
मुंबई : सध्या इंडियन आयडॉलचा 15 वा सीजन सुरू आहे. या सीजनमध्ये आपल्याला चैतन्य देवढे हा महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दिसतो आहे. अठरा वर्षाचा चैतन्य हा पुण्याच्या आळंदी या गावातील आहे. लहानपणापासूनच संगीताचे शिक्षण घेऊन सतत रियाज करत चैतन्य इंडियन आयडॉल 15 च्या स्टेजवर पोहोचला आहे.
लोकल 18 सोबत साधलेल्या बातचीतमध्ये चैतन्य म्हणाला, यंदाच्या वेळेस ट्रॉफी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येईल असं म्हणायला हरकत नाही. या आधी इंडियन आयडॉलच्या पहिल्या परवाची ट्रॉफी ही अभिजीत सावंत यांनी महाराष्ट्रात आणली होती. आता पुन्हा एकदा ही ट्रॉफी महाराष्ट्रात आणणार असा विश्वास चैतन्याने दर्शवला आहे. चैतन्याच्या गाण्यांची प्रचिती दूरवर आहे त्याचा अनुभव शेयर करताना तो म्हणाला की त्याला अमेरिकेतील एका अमराठी महिलेने कॉल करून सांगितले की मला तुमचे गाणे कळत नाही मात्र तुमच्या गाण्यातील आवाज भारी आहे.
advertisement
दरम्यान, चैतन्य देवढेने त्याच्या सुरेल आवाजात पोर बदनाम हे गाणं गायलं आहे. हे गाणं शुभम प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झाले असून या गाण्याची निर्मिती पायल गणेश कदम आणि गणेश दिनकर कदम यांनी केली आहे. तर सचिन आंबट यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. या गाण्याचे बोल अनिरूद्ध निमकर याने लिहीले असून त्यानेच या गाण्याला संगीत दिले आहे. हे गाणं नाशिकमध्ये चित्रीत करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
पुन्हा एकदा ट्रॉफी महाराष्ट्रात आणणार, इंडियन आयडॉलच्या स्टेजवर चैतन्य, पाहा खास मुलाखत
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement