Chhaava Movie: ‘छावा’मध्ये सोलापूरचा मावळा! 3 मिनिटांचा सीन अन् 12 तास शूट, थरारक अनुभव!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Chhaava Movie: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. यामध्ये सोलापूरचा कलाकार रोहन नंदाने यांनी सेनापतीची भूमिका साकारलीये.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर - छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून सर्वच शो हाऊसफुल्ल होत आहेत. याच चित्रपटात सोलापुरातील एका तरुणाने सेनापतीची भूमिका साकारली आहे. रोहन नंदाने असे सेनापतीची भूमिका साकारलेल्या तरुणाचे नाव आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
‘छावा’ या चित्रपटात सोलापूरमधील काही कलाकारांनी काम केलंय. यामध्ये सोलापूरकर रोहन नंदाने यांनी ‘छावा’ चित्रपटात सेनापतीची भूमिका साकारली आहे. 'छावा' 14 फेब्रुवारी रोजी देशभरात सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. योगायोगाने त्याच दिवशी रोहन यांचा वाढदिवस देखील होता. ही भूमिका आपल्यासाठी विशेष प्रेरणादायी आहे, असं रोहन सांगतात.
advertisement
रात्री 12 तास शूट
छावा चित्रपटातील एक दृश्य पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात शूट झालं. एका वाड्यात हे चित्रीकरण करण्यात आलं. हा सीन फक्त फक्त दोन ते तीन मिनिटांचा आहे. यामध्ये ‘ओम नमो पार्वते पते हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी’ असा तो डायलॉग आहे. या एका सीनसाठी सायंकाळी जवळपास 4 वाजता शूटिंग सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता या सीनचं शूटिंग संपलं. कौतुकास्पद सांगावं असं वाटतं की विकी कौशल यांनी वन टेक हा डायलॉग घेतलेला आहे आणि अंगावरती शहारा आणणारा हा सीन आहे. कारण हे तीन शूट करताना त्यांचा तो आवाज, कॉन्टॅक्ट मध्ये घेतलेला डायलॉग, डायलॉग सांगत असताना विकी कौशल्य यांची एनर्जी एकदम भावणारा क्षण आहे, असं रोहन सांगतात.
advertisement
दरम्यान, रोहन नंदाने यांनी आतापर्यंत अनेक मालिका तसेच चित्रपटांमध्ये पत्रकार, पोलीस अधिकारी, डॉक्टर, त्यानंतर वार्ड बॉय, बैंक ऑफिसर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. रोहनसाठी सर्वात अविस्मरणीय भूमिका अर्थातच छावा चित्रपटातील सेनापतीची आहे. त्यामुळेच आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्यानंतर 'छावा' तील सेनापती ही भूमिका विशेष प्रेरणादायी आहे, असं रोहन यांनी सांगितलं.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
February 19, 2025 10:32 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Chhaava Movie: ‘छावा’मध्ये सोलापूरचा मावळा! 3 मिनिटांचा सीन अन् 12 तास शूट, थरारक अनुभव!