Gautami Patil : गौतमीला भेटणं माझ्यासाठी फॅन मुमेंट! अभिनेत्री चिन्मयी सुमीतकडून मनापासून कौतुक, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री चिन्मयी सुमीत आणि गौतमी पाटील यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चिन्मयीनं गौतमीला भेटताच आनंद व्यक्त केला.
सबसे कातिक गौतमी पाटील असं म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी आता सेलिब्रेटी आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांप्रमाणेच कलाकार देखील गौतमीचे चाहते झाले आहेत. गौतमी नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तलास' असं तिच्या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात अभिनेत्री चिन्मयी सुमीत देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. नुकतंच सिनेमातील गाणं रिलीज करण्यात आलं. हे गाणं गौतमीवर चित्रीत करण्यात आलं आहे.
'तलास' सिनेमातील धम्माल गाण्याचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हळदीच्या सोनसळी रंगात न्हालेलं हे ग्लॅमरस, जल्लोषमय आणि रॉयल थाटात साकारलेलं 'या गो बायांनो हळद घेऊनशी...' हे गाणं रिलीज झालं आहे. गौतमी पाटीलनं यावर नृत्य केलं असून नृत्यदिग्दर्शन नरेंद्र पंडित यांनी केले आहे. महाराष्ट्राची लाडकी गायिका वैशाली सामंत यांनी हे गाणं गायलं आहे.
advertisement
सिनेमाच्या या कार्यक्रमाला अभिनेत्री चिन्मयी सुमीतनं हजेरी लावली होती. तेव्हा गौतमीचं कौतुक करत तिला भेटणं माझ्यासाठी फॅन मुमेंट असल्याचं सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, गौतमी येणार आहे आणि ती हे नृत्य साकारणार आहे हे कळलं तेव्हा माझ्यासाठी ती फॅन मुमेंट होती. मला सारखं असं वाटतं होतं की जिला आपण सारखं सारखं बघत असतो, इतक्या लोकांचा भरगोस प्रतिसाद मिळतो अशी स्टार आपल्याकडे येणार आहे. तर ती कशी असेल याची खूप उत्सुकता होती.
advertisement
advertisement
तिची मेहनत घेणं, तिला पटपट गोष्टी कळणं, नृत्यदिग्दर्शकाला, त्याच्या गाण्याला कोरिओग्राफीला, सिनेमॅटोग्राफरचं स्वप्न असावं अशी ती परफॉर्मर आहे. गौतमीचं खूप खूप कौतुक. चिन्मयीकडून कौतुक ऐकून गौतमी देखील भारावून गेली.

'तलास' या रहस्यमय-रोमांचक चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'तलास'मध्ये प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री आहे. रहस्यमय घडामोडींची गुंतागुंत आणि अखेरीस होणारी रहस्याची उकल प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देणारी आहे. या सिनेमात चिन्मयी सुमित, गणेश यादव, प्रणव रावराणे, राहुल पाटील, पूजा जैस्वाल, निलेश भेरे, वेदांत खोत, रेखा राणे, अजय पाध्ये आणि गौतमी पाटील आदी कलाकार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 28, 2026 1:40 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gautami Patil : गौतमीला भेटणं माझ्यासाठी फॅन मुमेंट! अभिनेत्री चिन्मयी सुमीतकडून मनापासून कौतुक, VIDEO








