स्टेजवर बोलावलं, बुके दिला अन्... कॉमेडियन सुनील पालसोबत आयोजकांनी नको ते केलं, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कॉमेडियन सुनील पालचा मुंबईतील एका कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात त्याला स्टेजवर बोलावून आयोजकांनी नको ती गोष्ट केली.
कलाकारांना अनेकदा अनेक ठिकाणी मानसन्मानासोबत अपमान देखील सहन करावा लागतो. असंच काहीसं झालं आहे कॉमेडियन सुनील पॉलबरोबर. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात भर कार्यक्रमात सुनील पॉलचा अपमान करण्यात आला. त्यांना स्टेजवरून निघून जाण्यास सांगण्यात आलं. सुनील पॉलबरोबर घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हा व्हिडीओमध्ये मुंबईतील एका कार्यक्रमातील असल्याची माहिती समोर आली. काही कवी मंचावर उपस्थितीत आहेत. तेव्हाच सुनील पॉलला मंचावर बोलावलं जातं. त्यांना पुष्पगुच्छ दिला जातो. सुनील पाल सगळ्यांचे आभार मानतात. ते माईकजवळ जातात पण त्यांच्या बाजूला उभा असलेला माणूस त्यांना वारंवार थांबवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना तिथून निघून जाण्यास सांगतो.
( Bigg Boss Marathi 6 : राकेशसोबत राडा! तरी RB ची बहीण देणार विशालसाठी 'खास गिफ्ट'; 'तुला एक किलो...' )
advertisement
यावेळी सुनील पाल याने कमालीचा संयम दाखवला. त्याने प्रेक्षकांसमोर आदरानं झुकून काहीही न बोलता आपल्या बॉडीलँग्वेजमधून सगळ्यांचे आभार मानले. व्हिडीओमध्ये तो माणूस सुनील पॉलचा माईकवरून हात झटकून लावतोय. त्याला म्हणतोय, एक सेकेंड, आप स्टेज से उतरिए. इसके आगे कुछ नही. जितना किया हैं उतना है. आप बैठ जाइए जाकर. त्यावर सुनील पाल म्हणतो, मला धन्यवाद कर म्हणूदेत.पण समोरचा माणूस अजिबात ऐकत नाही. तो सुनील पॉलचा अपमान करून त्याला वारंवार तिथून निघून जायला सांगतो.
advertisement
advertisement
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ 17 जानेवारी 2026 चा असल्याची माहिती समोर येत आहे. जुहूच्या इस्कॉनमध्ये झालेल्या काव्य संमेलनाचा आहे.
कॉमेडियन सुनील पाल अनेक वर्ष कपिल शर्मा शोचा भाग होता.पण काही वर्षांआधी त्याने हा शो सोडला. कपिल आणि सुनील यांच्यात भांडण झाल्याच्या चर्चा होत्या. कपिलने त्याला शोमध्ये पुन्हा बोलावलं होतं पण त्याने येण्यास नकार दिला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 12:30 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
स्टेजवर बोलावलं, बुके दिला अन्... कॉमेडियन सुनील पालसोबत आयोजकांनी नको ते केलं, VIDEO








