Dashavatar : "ओळख नव्हती, नंबरही नव्हता"; 'दशावतार'साठी कशी झाली दिलीप प्रभावळकरांची निवड? दिग्दर्शकाने सांगितलं
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Dashavatar : दिलीप प्रभावळकर अभिनीत सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' हा चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. पटकथा लिहिण्याआधीच दिग्दर्शकाने मुख्य भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर यांची निवड केली होती.
Dashavatar : दिलीप प्रभावळकर अभिनीत सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' हा चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. पटकथा लिहिण्याआधीच दिग्दर्शकाने मुख्य भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर यांची निवड केली होती. नुकतच एका मुलाखतीत दिग्दर्शकाने याचा उलगडा केला आहे. गेले तीन दिवस बॉक्स ऑफिसवर 'दशावतार' या चित्रपटाचीच चर्चा आहे. तिकीटबारीवर या चित्रपटाने बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. एक उत्कृष्ट टीम असलेला, संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतलला 'दशावतार' हा चित्रपट आहे. रिलीजच्या तीन दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 3.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'दशावतार' चित्रपट करायचं कधी ठरलं?
एबीपीला दिलेल्या मुलाखतीत सुबोध खानोलकर म्हणाला,"ओशन फिल्म कंपनी या आमच्या निर्मितीसंस्थेद्वारे चित्रपटाची निर्मिती करावी, असा आमचा विचार होता. या चित्रपटाची गोष्ट मी लिहेन असं सुरू होतं. त्यावेळी जी गोष्ट सुचली ती दशावतार, कोकण या पार्श्वभूमीवरची गोष्ट सुचली. गोष्ट लिहिल्यानंतर सगळ्यात पहिले असं ठरलं की आव्हानात्मक भूमिका आहे आणि एकचं नाव डोळ्यासमोर होतं ते म्हणजे दिलीप प्रभावळकर. त्यावेळी त्यांची आणि माझी ओळख नव्हती. इकडून-तिकडून त्यांचा नंबर मिळवला आणि भेटण्यासाठी परवानगी घेतली. दिलीप काका संपूर्ण संहिता हातात असल्याशिवाय त्यातले संवाद, बारकावे माहित असल्याशिवाय सहसा होकार देत नाहीत. माझ्याकडे तर फक्त गोष्ट होती. त्यांना ती थोडीशी गोष्ट ऐकवली आणि आमच्या अर्ध्या तासाची मिटींग साडे तीन -चार तास चालली. तेव्हा मला कुठेतरी आशा वाटू लागली होती. मी डोक्यात फिक्स केलं होतं जर दशावतारला दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला तर गोष्ट गुंडाळून ठेवायची. कारण ही गोष्ट इतर कोणीही सादर करू शकत नाही".
advertisement
'दशावतार'साठी दिलीप प्रभावळकरांचीच निवड का?
सुबोध खानोलकर म्हणाला,"दशावतार'ची कथा, या चित्रपटातील बाबुली मेस्त्रीची भूमिका एका वृद्ध दशावतारी कलाकाराची आहे. या पात्राला अभिनय, लूक्स अशा अनेक गोष्टींबद्दल प्रचंड छटा आहेत. हे सगळं करू शकणारे, या भूमिकेची खोली माहिती असणारे दिलीप प्रभावळकरच आहेत हे कुठेतरी डोक्यात फिट होतं. त्यामुळे मी त्यांना विचारलं..आणि पटकथा लिहिण्याआधीच त्यांच्याकडून मला तत्त्व: होकार आला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 3:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dashavatar : "ओळख नव्हती, नंबरही नव्हता"; 'दशावतार'साठी कशी झाली दिलीप प्रभावळकरांची निवड? दिग्दर्शकाने सांगितलं