Dhurandhar Trailer Out : खतरनाक लुक, दमदार डायलॉग, अंगावर शहारे आणणारी प्रत्येक फ्रेम; रणवीरच्या 'धुरंधर'चा ट्रेलर आऊट

Last Updated:

Dhurandhar Trailer Out : रणवीर सिंहच्या आगामी 'धुरंधर' या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला आहे. ट्रेलरमधील डायलॉग अंगावर शहारे आणणारे आहेत.

News18
News18
Dhurandhar : रॉकी और रानी’नंतर तब्बल दोन वर्षांनंतर रणवीर सिंह ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा एक गँगस्टर ड्रामा असून 5 डिसेंबरला हा बहुचर्चित चित्रपट रिलीज होणार आहे. रिलीजपूर्वी निर्मात्यांनी आता ‘धुरंधर’चा दमदार ट्रेलर रिलीज केला आहे. ट्रेलरमुळे चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे. प्रत्येक दृश्यात दमदार डायलॉग पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांसारखे तगडे कलाकार आहेत. तमिळ अभिनेत्री सारा अर्जुन या चित्रपटात रणवीरच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत झळकणार आहे. ट्रेलरमध्ये प्रचंड सस्पेन्स आणि अ‍ॅक्शनची मेजवानी दिसते. चित्रपटात भरपूर रक्तपातही पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
advertisement
धुरंधर’चा ट्रेलर रिलीज
रणवीर सिंहचा 'धुरंधर'मधील लुक खूपच खतरनाक आहे. अभिनेत्याची मारामारी पाहून अंगावर शहारे येतात. 'धुरंधर'च्या ट्रेलरमध्ये हिंसा आणि रक्तपाताची झलक दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणवीर सिंह पुन्हा एकदा रुपेरी पद्यावर मोठं कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे.
advertisement
धुरंधर’च्या ट्रेलरवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया
'धुरंधर'च्या ट्रेलरवर कमेंट्स करण्यावाचून सेलिब्रिटी आणि चाहते स्वत:ला रोखू शकले नाहीत. रणवीर सिंहला असा सीरियस लुक खूपच सूट होत आहे, पद्मावतचे वाइब्स!!!!! 500+ कोटींची फिल्म”. हे अविश्वसनीय आहे!! आदित्य धर आणि रणवीर सिंह यांना सलाम!! खूप आवडलं!!”,“धुरंधर म्हणजे = अंगावर काटा आणणारा”, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
advertisement
जिओ स्टुडिओज आणि बी62 स्टुडिओजची बहुप्रतीक्षित फिल्मधुरंधर’ 5 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रुपेरी पडद्यावर धाडस, रहस्य आणि जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’, ‘आर्टिकल 370’ आणिधूम धामसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला जिओ स्टुडिओज, आदित्यलोकेश धर यांच्या बी62 स्टुडिओजच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘धुरंधर’चे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती आदित्य धर यांनी केली आहे, तर सहनिर्माते ज्योती देशपांडे आणि लोकेश धर आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dhurandhar Trailer Out : खतरनाक लुक, दमदार डायलॉग, अंगावर शहारे आणणारी प्रत्येक फ्रेम; रणवीरच्या 'धुरंधर'चा ट्रेलर आऊट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement