Madhurani Prabhulkar : आई परत येतेय...! मधुराणी प्रभुलकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, अमोल कोल्हेंसोबत करणार स्क्रिन शेअर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Madhurani Gokhale Prabhulkar New Seria : l'आई कुठे काय करते' या मालिकेच्या यशानंतर अभिनेत्री मधुराणी गोखले मालिका विश्वात कमबॅक करतेय. मधुराणी पुन्हा एकदा आईच्या भुमिकेत दिसणार आहे.
'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर. 'आई कुठे काय करते' या मालिकेनं मधुराणीला नवी ओळख दिली. मालिकेतील अरुंधतीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तब्बल 5 वर्ष या मालिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'आई कुठे काय करते' मालिकेनंतर मधुराणी काय करते असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर त्या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या यशानंतर अभिनेत्री मधुराणी गोखले मालिका विश्वात कमबॅक करतेय. मधुराणी पुन्हा एकदा आईच्या भुमिकेत दिसणार आहे. मात्र ही आई थोडी वेगळी असणार आहे. मधुराणीचा नव्या मालिकेतील पहिला लुक समोर आला आहे. मधुराणीला पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून पाहताना प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
advertisement
गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनीवर कळणार सर्वात मोठी बातमी. 18 नोव्हेंबरला असं म्हणत पोस्ट शेअर करण्यात आल्या होत्या. मालिकेतील नायिकांच्या चेहऱ्यावर माती, जखमा दिसत होत्या. नेमकं काय होणार आहे, कसली मोठा बातमी याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. ती मोठी बातमी म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
advertisement

'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' या स्टार प्रवाह वाहिनीवरील आगामी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर प्रमुख भूमिकेत आहे. जोतीराव फुले आणि सावित्रीबाई यांच्या आयुष्यावर ही मालिका आधारित आहे. मुख्य भूमिकेत अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर दिसणार आहे. नुकताच मालिकेचा लाँचिग सोहळा पार पडला. यावेळी मधुराणी सावित्रीबाईंच्या लुकमध्ये समोर आली.
advertisement
advertisement
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होणार आहे. या मालिकेतून मधुराणी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर दिसणार आहे. मी सावित्रीबाई जोतीवर फुले ही मालिका कोणत्या वेळेला सुरू होणार आहे आता कोणती मालिका संपणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 1:07 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Madhurani Prabhulkar : आई परत येतेय...! मधुराणी प्रभुलकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, अमोल कोल्हेंसोबत करणार स्क्रिन शेअर


