टाळाटाळ करू नका! 7/12 उताऱ्यात हे दोन शब्द नसतील तर तुमची जमीन होणार शासन जप्त
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Satbara Utara : राज्यात शेती किंवा बिनशेती जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असले तरी अनेकजण जागेचा दर, लोकेशन किंवा विक्रेत्याच्या आश्वासनावरच निर्णय घेतात.
मुंबई : राज्यात शेती किंवा बिनशेती जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असले तरी अनेकजण जागेचा दर, लोकेशन किंवा विक्रेत्याच्या आश्वासनावरच निर्णय घेतात. मात्र, जमिनीचा सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक दस्तऐवज असतो तो म्हणजे सातबारा उतारा. या कागदात जमिनीच्या मालकीपासून ते हक्क, अटी, उपयोग आणि कायदेशीर बंधने याबद्दल सर्व नोंदी स्पष्टपणे असतात. विशेष म्हणजे यातील ‘शर्त’ आणि ‘धारणप्रकार’ या नोंदीकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांना भविष्यात आर्थिक नुकसान, जमीन जप्ती किंवा न्यायालयीन वादांना सामोरे जावे लागते.
जमिनीचे प्रकार काय? कोणता प्रकार खरेदीसाठी सुरक्षित?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार राज्यातील जमीन खालील तीन मुख्य श्रेणीत विभागली जाते:
जुनी शर्त जमीन (वर्ग-1)
पूर्णपणे खासगी मालकीची जमीन खरेदी-विक्रीला कोणतीही शासकीय परवानगी आवश्यक नाही. सातबाऱ्यावर ‘खा’ असा उल्लेख दिसतो.व्यवहारासाठी सर्वात सुरक्षित प्रकार
नवीन शर्त जमीन (वर्ग-2)
वतन, इनाम, पुनर्वसन, भूसंपादन आदी कारणांनी राज्य सरकारकडून दिलेली जमीन या जमिनीवर व्यवहार करताना शासनाची लेखी परवानगी आवश्यक.सातबाऱ्यावर “शर्त लागू” किंवा तत्सम उल्लेख असतो. परवानगीशिवाय व्यवहार केल्यास जमीन जप्त होण्याची शक्यता
advertisement
शासकीय पट्टेदार जमीन
ही जमीन वापरासाठी दिली जाते, मालकी देण्यात येत नाही. विक्री किंवा हस्तांतरणावर कठोर निर्बंध असतात. परवानगीशिवाय केलेला कोणताही व्यवहार बेकायदेशीर मानला जातो.तसेच सरकार जमीन परत घेऊ शकते.
सातबाऱ्यावर 'शर्त' आणि 'धारणप्रकार'असणे का महत्वाचे?
जमिनीची कायदेशीर स्थिती समजण्यासाठी सातबारा हा प्रमुख पुरावा मानला जातो. या कागदात ‘शर्त’ किंवा ‘धारणप्रकार’ची नोंद नसल्यास पुढील अडचणी निर्माण होऊ शकतात जसे की,
advertisement
सरकारी परवानगीची आवश्यकता आहे का?हे कळत नाही
व्यवहार बेकायदेशीर ठरू शकतो.
जमीन जप्तीची वेळ येऊ शकते.
विक्री नोंदणी नाकारली जाऊ शकते.
शासनाचा नजराणा भरावा लागू शकतो.
न्यायालयीन तक्रारी आणि खटले उभे राहू शकतात.
विशेषतः नव्या शर्तीच्या जमिनीवर परवानगीशिवाय व्यवहार केल्यास तो पूर्णपणे अवैध मानला जातो.
जमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?
सातबाऱ्यावर ‘शर्त’ आणि ‘धारणप्रकार’ स्पष्ट नमूद आहेत का हे तपासा
advertisement
जमीन कोणत्या श्रेणीची (वर्ग 1 किंवा वर्ग 2) आहे हे निश्चित करा
सरकारी अट असल्यास संबंधित तहसीलदार किंवा महसूल अधिकाऱ्याची पूर्व लेखी परवानगी घ्या विक्रेत्याकडे जमीन कशी आली?याची खात्री करा. सर्व कागदपत्रे (NA परवाना, मागील सातबारा, फेरफार नोंदी, नकाशा) वकीलाकडून तपासून घ्या
कुठे चौकशी करावी?
आपले सरकार सेवा केंद्र
तहसील कार्यालय
advertisement
भूमी अभिलेख कार्यालय
जिल्हा निबंधक कार्यालय
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 12:57 PM IST


