advertisement

बांधावर रंगणार प्रेमाची गोष्ट! 'हळद रुसली कुंकू हसलं'मध्ये दिसणार दुष्यंतचा रांगडा अवतार; जिंकणार कृष्णाचं मन?

Last Updated:

शहरात वाढलेला आणि ग्रामीण आयुष्यापासून चार हात लांब राहणारा दुष्यंत, आता आपल्या प्रेमासाठी म्हणजेच कृष्णासाठी चक्क नांगर धरायला निघाला आहे. दुष्यंतचा हा नवा अवतार प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी ठरणार आहे.

News18
News18
मुंबई : ज्याला मातीची चीड होती, ज्याला शेतीचं नाव काढलं तरी तिटकारा वाटायचा, तोच 'दुष्यंत' आता चक्क चिखलात राबायला सज्ज झालाय. स्टार प्रवाहवरील 'हळद रुसली कुंकू हसलं' ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. शहरात वाढलेला आणि ग्रामीण आयुष्यापासून चार हात लांब राहणारा दुष्यंत, आता आपल्या प्रेमासाठी म्हणजेच कृष्णासाठी चक्क नांगर धरायला निघाला आहे. दुष्यंतचा हा नवा अवतार प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी ठरणार आहे.

कृष्णासाठी दुष्यंतची कसरत

मालिकेची नायिका कृष्णा ही अस्सल शेतकरी कन्या आहे. तिच्यासाठी तिची शेती हीच तिचं सर्वस्व आहे. सुरुवातीला दुष्यंत आणि कृष्णाच्या विचारात जमीन-अस्मानाचा फरक होता. दुष्यंतला गावाकडचं आयुष्य कधीच भावलं नव्हतं. पण म्हणतात ना, प्रेमात माणूस काय करेल याचा नेम नाही. कृष्णाची मनधरणी करण्यासाठी आणि तिच्या मनात स्वतःसाठी जागा निर्माण करण्यासाठी दुष्यंतने आता थेट शेतात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. हा फक्त शेतीचा प्रवास नसून, एका अहंकारी माणसाचा मातीशी नातं जोडण्याचा भावनिक प्रवास आहे.
advertisement

अभिषेक रहाळकरचा नवा अनुभव

या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेता अभिषेक रहाळकर कमालीचा उत्साही दिसला. तो म्हणतो, "दुष्यंतला सुरुवातीला मातीची भीती आणि शिसारी वाटायची, पण कृष्णामुळे ती भीती आता आदरात बदलत आहे. कृष्णाला आपलंसं करण्यासाठी तो तिच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबणार आहे. वैयक्तिकरित्या मला शेतकऱ्यांबद्दल प्रचंड आदर आहे. ते अहोरात्र कष्ट करतात म्हणून आपल्या ताटात अन्न येतं. एका अभिनेत्याच्या निमित्ताने मला हे शेतकरी आयुष्य जवळून अनुभवायला मिळतंय, यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो."
advertisement












View this post on Instagram























A post shared by Star Pravah (@star_pravah)



advertisement

दुष्यंत आणि कृष्णाच्या नात्यात येणार गोडवा?

दुष्यंत आणि कृष्णा यांच्यात सध्या जो दुरावा आहे, तो या 'शेतकरी' अनुभवामुळे कमी होईल का? दुष्यंत चिखलात काम करताना कृष्णाला त्याची दया येईल की त्याचं हे रूप पाहून ती पुन्हा त्याच्या प्रेमात पडेल? हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असेल. दुष्यंतचा हा बदल कृष्णाला नक्कीच भारावून टाकणारा ठरणार आहे.
advertisement

कधी पाहता येईल?

जर तुम्हालाही दुष्यंत आणि कृष्णाची ही आगळीवेगळी केमिस्ट्री आणि बांधावरची प्रेमकथा अनुभवायची असेल, तर 'हळद रुसली कुंकू हसलं' पाहायला विसरू नका. दररोज दुपारी १ वाजता फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
बांधावर रंगणार प्रेमाची गोष्ट! 'हळद रुसली कुंकू हसलं'मध्ये दिसणार दुष्यंतचा रांगडा अवतार; जिंकणार कृष्णाचं मन?
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement