पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला तर घाबरून सोडली इंडस्ट्री, आज 1600 कोटींचा बिग हिट देऊन करतोय कल्ला
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
खूप कमी लोकांना माहित आहे की या अभिनेत्याने त्याचा पहिला चित्रपट फ्लॉप होताच इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. जिथे, 'पुष्पा 2' च्या यशाचं श्रेय अल्लू अर्जुनला दिलं जात आहे, त्याचबरोबर या चित्रपटात आणखी एक अभिनेता आहे ज्याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा अभिनेता म्हणजे फहद फासिल, ज्याने 'पुष्पा 2' मध्ये पोलिसांची भूमिका बजावून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या.
मात्र खूप कमी लोकांना माहित आहे की फहद फासिलने त्याचा पहिला चित्रपट फ्लॉप होताच इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. दिग्गज चित्रपट निर्माते फासिलचा मुलगा फहद फासिलने आपल्या वडिलांप्रमाणे चित्रपटांमध्ये प्रवेश केला, परंतु त्याचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाला. आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या अपयशामुळे हा अभिनेता इतका निराश झाला की त्याने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.
advertisement
पहिल्या चित्रपटानंतर इंडस्ट्री सोडली
अभिनेत्याचा पहिला चित्रपट फ्लॉप होताच त्याच्या वडिलांकडे बोटे दाखवली जाऊ लागली. याबाबत एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत फहादने म्हटले होते की, त्याचा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्याच्या वडिलांना दोष देऊ नये. कोणतीही तयारी न करता तो इंडस्ट्रीत आला ही त्याची चूक होती. पहिल्याच अपयशानंतर, अभिनेत्याला वाटू लागले की कदाचित तो चित्रपटांसाठी बनलेला नाही.
advertisement
आता फहाद त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी झाला आहे. त्याच्या कामाचं सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. दरम्यान, अशी बातमी आहे की लोकप्रिय दिग्दर्शक इम्तियाज अलीने फहादला त्याच्या आगामी चित्रपटासाठी विचारले आहे. या चित्रपटात ‘ॲनिमल’ फेम नॅशनल क्रश म्हणजेच तृप्ती दिमरी मुख्य भूमिका साकारणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 26, 2024 4:52 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला तर घाबरून सोडली इंडस्ट्री, आज 1600 कोटींचा बिग हिट देऊन करतोय कल्ला