प्रसिद्ध मराठी अभिनेता विकतोय चहा, मुंबईत सुरू केला स्टॉल, का आली अशी वेळ? Video

Last Updated:

Marathi Actor: प्रसिद्ध मराठी अभिनेता मुंबईतील दादरमध्ये चहा विकतोय. मयूर धुरी यांनी आपल्या याच व्यवसायाबाबत माहिती दिलीये.

+
प्रसिद्ध

प्रसिद्ध मराठी अभिनेता विकतोय चहा, का आली अशी वेळ? Video

नमिता सूर्यवंशी, प्रतिनिधी
मुंबई: काही कलाकार हे आपल्या कलेसोबतच व्यावसायिक क्षेत्रात देखील स्वत:ला आजमावत असतात. मुंबईतील अशाच एका मराठी कलाकाराचा अभिनय ते व्यावसायिक असा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मयूर धुरी असं या अभिनेत्याचं नाव असून 1980 च्या दशकात वडिलांनी सुरू केलेल्या चहाचा स्टॉल आता प्रसिद्ध ब्रँड बनला आहे. याबाबतच मयूर यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
दादरमधील कबूतर खाण्याजवळ शिवसेना गल्लीच्या कॉर्नरला ‘वाह मराठी दादर स्पेशल चहा’ स्टॉल आहे. मयूर यांचे वडील प्रकाश धुरी हे आधी चहा विकायचे. वडिलाना व्यवसाय करताना पाहून मयूर यांना लहानपणापासून व्यवसायात आवड निर्माण झाली. ते लहानपणापासूनच छोटे छोटे व्यवसाय करायचे. जसं की दिवाळीत फराळ विकण्याचा स्टॉल किंवा मकर संक्रांतीमध्ये पतंग असे हंगामी व्यवसाय ते करायचे. पण यानंतर वडिलांच्या जाण्यानंतर त्यांनी चहाचा व्यवसाय पुढे न्यायचा ठरवला.
advertisement
अभिनयातून व्यवसायाकडे
मयूर यांचे शिक्षण बालमोहन शाळेतून झालं होतं. विद्याताई पटवर्धन या त्यांच्या मार्गदर्शक होत्या. मयूर यांनी अनेक नाटक मालिका चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केलीय. ‘लक्ष्य’ सारख्या मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका केली आणि त्याला लोकप्रियता देखील मिळाली. पण मुळात आपला कल व्यवसायाकडे आहे आणि मराठी माणसांनी व्यवसायात उतरावं हा अजेंडा असल्यामुळे व्यवसाय करायला सुरुवात केली, असं मयूर सांगतात.
advertisement
असं बनवलं ब्रँड
1980 च्या दशकात मयूर यांच्या वडिलांनी दादरमध्ये चहाचा स्टॉल सुरू केला होता. शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. पुढे वडिलांच्यानंतर हाच व्यवसाय पुढे न्यायचा निर्णय मयूर यांनी घेतला. आपला चहा वेगळा असावा यासाठी त्यांनी वेगवेगळ्या चहा पावडरवर संशोधन केलं. दूध कोणत वापरायचं ते चहासाठी मसाला कोणता असेल यावर बारीकपने लक्ष देऊन मयूर यांनी चहा बनवून विकायला सुरुवात केली.
advertisement
कोरोनाचा फटका आणि पुन्हा सुरुवात
मयूर यांनी कोरोनाच्या आधीच चहाचा व्यवसाय सुरू केला होता. तेव्हा त्यांचं उत्पन्न वर्षाला जवळपास 1 लाखापर्यंत जायचं. या नफ्यातून त्यांनी अजून 2 ठिकाणी चहाचा व्यवसाय सुरू केला. पण कोरोनाचा फटका त्यांनाही बसला आणि चित्र पालटलं. पण हार न मानता मयूर यांनी पुन्हा एकदा जोरात सुरुवात करून काम केलं आणि आज जवळपास ते चहा सोबत अजून 44 पदार्थ त्यांच्या स्टॉलवर विकतात. तसेच यामुळे त्यांना जवळपास 5 लाखांपर्यंत उत्पन्न वर्षाला मिळतं.
advertisement
दरम्यान, अभिनय क्षेत्राची आवड आहेच. पण मराठी माणसाने व्यवसायात उतरून एक उत्तम व्यावसायिक व्हावं, असं त्यांना नेहमी वाटतं. त्यासाठीच मयूर यांनी वडिलांचा व्यवसाय पुढे न्यायचा निर्णय घेतला आणि आता ते यशस्वी व्यावसायिक आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
प्रसिद्ध मराठी अभिनेता विकतोय चहा, मुंबईत सुरू केला स्टॉल, का आली अशी वेळ? Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement