मनोरंजन विश्वात खळबळ! प्रसिद्ध गायकावर जीवघेणा हल्ला, पोटात गोळी लागून गंभीर जखमी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध गायकावर गोळीबार झाला असून तो जखमी आहे. हल्ल्याच्या जबाबदारी राजस्थानमधील एक जगप्रसिद्ध गँगने स्वीकारली आहे.
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अभिनेते कलाकारांवर गोळीबार करण्याच्या घटना मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. अशातच आता आणकी एका प्रसिद्ध गायकावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गायकावर गोळीबार करण्यात आला असून त्यात तो जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तेजी काहलो असं प्रसिद्ध पंजाबी गायकाचं नाव असून त्यावर कॅनडामध्ये हल्ला झाला आहे. गायकाला गोळी लागली असून तो जखमी झाला आहे. कुख्यात राजस्थानचा गुंड रोहित गोदारा याला गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. टोळीने स्वतः एका पोस्टमध्ये तेजी काहलोंवर गोळीबार केल्याचं सांगितलं आहे. हल्ला का केला हे देखील स्पष्ट केले. फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले आहे ते पाहूया.
advertisement
रोहित गोदारा टोळीशी जोडलेल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये असे म्हटले होते की पंजाबी गायक तेजी काहलोंवर गोळीबार करण्यात आला आहे. त्याच्या पोटात गोळी लागली आहे. तो थोडक्यात बचावला. आता तरी त्याला समजले असेल तर ठीक आहे. नाहीतर पुढच्या वेळेस आम्हाला त्याला संपवू.
तेजी काहलोंवर गोळीबार
टोळीला जबाबदार धरलेल्या कथित पोस्टमध्ये असे लिहिले होते की, "जय श्री राम. आम्ही कॅनडामध्ये तेजी काहलोंवर गोळीबार करण्याचे नियोजन केले. त्याच्या पोटात गोळी लागलीये. जर तुम्हाला समजले असेल तर ठीक आहे, अन्यथा आम्ही पुढच्या वेळी ते सविस्तरपणे सांगू." जो कोणी कॅनडामधील आपल्या बांधवांबद्दल माहिती देईल आणि शत्रूंना आर्थिक मदत करेल त्याच्या वाट्याला असंच येईल.
advertisement
पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, "आमच्या बांधवांकडे पाहणे विसरून जा, जे काही चुकीचे विचार करतात त्यांच्या वाट्यालाही असंच नशीब येईल, जे इतिहासाच्या पानांवर उमटेल. जर या देशद्रोह्यामुळे कोणी आमच्या बांधवांकडे पाहिले किंवा आर्थिक चूक केली तर आम्ही त्यांच्या कुटुंबियांनाही सोडणार नाही. आम्ही त्यांना नष्ट करू. ही चेतावणी सर्व व्यापारी, बिल्डर आणि हवाला व्यापाऱ्यांसाठी आहे. फक्त वाट पहा आणि काय होते ते पहा."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2025 1:26 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मनोरंजन विश्वात खळबळ! प्रसिद्ध गायकावर जीवघेणा हल्ला, पोटात गोळी लागून गंभीर जखमी